नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक नियमात मोठा बदल; नामनिर्देशन फेटाळण्याविरुद्ध अपिलाची तरतूद रद्द, मंत्रिमंडळाची अध्यादेशाला मंजुरी
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


समीर वानखेडे ब्युरो चीफ:
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी नगर विकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
*काय आहे नेमका बदल?*
आतापर्यंत राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवाराचे नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळल्यानंतर त्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करण्याची तरतूद होती. ही तरतूद महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम, १९६६ मधील नियम १५ व १७ च्या उप-नियम (१) (ब) मध्ये होती.
मात्र, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक नियमावली, २००६ मध्ये अशी अपिलाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपरिषद/नगरपंचायत यांच्या नियमांमध्ये विसंगती होती. ही विसंगती दूर करून सर्वत्र एकसमानता आणण्यासाठीच हा सुधारणा अध्यादेश आणला जात आहे.
*अध्यादेशातील तीन प्रमुख सुधारणा*
१. *व्याख्येत बदल:* अधिनियमाच्या कलम २ च्या पोट-कलम (७) मधील “परिषदेचा सदस्य” या शब्दांऐवजी आता *“परिषदेचा व पंचायतींचा सदस्य”* असा बदल करण्यात येईल.
२. *अपिलाची तरतूद वगळली:* सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कलम १७ मधील पोट-कलम (२), उपखंड (ड) मधील *“आणि नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याविरुद्ध किंवा नाकारण्याविरुद्ध अपिले”* हे शब्द पूर्णपणे वगळण्यात येतील. म्हणजेच आता नामनिर्देशन फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही.
३. *नवीन पोट-कलम समाविष्ट:* कलम ३४१-ब मधील पोट-कलम (४) नंतर नवीन पोट-कलम (५) समाविष्ट केले जाईल. त्यानुसार, “नगरपरिषदेमधील राज्य निवडणूक आयुक्त, मतदार यादी तयार करणे, मतदानाची रीत व मतदानावरील इतर निर्बंधासंबंधीची कलमे १०अ, ११, १२, १३ व १४ ची तरतूद योग्य त्या फेरफारांसह नगरपंचायतीलाही लागू होईल.”
या सुधारणांसाठी *महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, २०२६* काढण्यात येणार आहे.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

अलवर: जिला प्रमुख की रेस में बन्नाराम मीणा? अलवर और लक्ष्मणगढ़ के सियासी गलियारों में इन दिनों भाजपा…
पूरी खबर पढ़ें →
नागपुर शहर के मोतीबाग रेलवे अंडरपास पर स्टील गर्डर लगाने के कार्य को सुविधाजनक बनानें के लिए 15…
पूरी खबर पढ़ें →
वित्त ममंत्रालय भारत सरकार ने यूपीआई भुगतान को लेकर स्थिति को स्पष्ट कर दिया है। भारत सरकार ने…
पूरी खबर पढ़ें →
ABVP राजनांदगांव नई कार्यकारिणी घोषित, अक्षत श्रीवास्तव फिर बने नगर मंत्री निकिता श्रीरंगे, प्रतीक गढ़वाल, भूपेंद्र पाल बने…
पूरी खबर पढ़ें →
गढ़चिरौली से वंदे भारत LIVE TV NEWS के लिए ब्यूरो चीफ समीर वानखेड़े की विशेष ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र…
पूरी खबर पढ़ें →
महाराष्ट्र से वंदे भारत LIVE TV NEWS के लिए ब्यूरो चीफ समीर वानखेड़े की रिपोर्ट* राज्य के स्कूली…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।