वडा खाताना आली शिंक, गेला महिलेचा जीव! चंद्रपूरमध्ये हृदय हेलावणारी घटना
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


वडा खाताना आली शिंक, गेला महिलेचा जीव! चंद्रपूरमध्ये हृदय हेलावणारी घटना
तान्हा पोळा उत्सवाच्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण होतं, पण एका क्षणात तो आनंद शोकात बदलला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी गावात सणासाठी बनवलेले वडे खात असताना एका महिलेला अचानक शिंक आली. त्यामुळे वड्याचा बारीक कण श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात गेला आणि त्या बेशुद्ध झाल्या.
कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ ओम भुरना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना शुद्ध आली, पण प्रकृती गंभीर राहिल्याने डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूरला रेफर केले.
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख हस्तकला चेतन गणवीर, वय ३० वर्षे अशी झाली आहे.
हस्तकला गणवीर या उमेद अभियानांतर्गत बचत गटाच्या प्रवर्तक म्हणून काम करत होत्या. समाजात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्या मागे पती, अवघ्या पाच महिन्यांचे बाळ आणि सासू आहेत. आईच्या मृत्यूची जाणीव नसलेल्या त्या निष्पाप बाळाच्या रडण्याने सर्वांचेच मन हेलावले.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏Dr.pintu Paul Vande Mataram Live tv news District Repoter
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

झालावाड़, 22 नवंबर 2026 वीरांगना झलकारी बाई की जयंती के उपलक्ष में आज झालावाड़ में एक भव्य कार्यक्रम…
पूरी खबर पढ़ें →
लखनऊ। सहारा इंडिया परिवार, साईं प्रसाद ग्रुप, पल्स कंपनी सहित विभिन्न चिटफंड कंपनियों में निवेश करने वाले लाखों-करोड़ों…
पूरी खबर पढ़ें →
कटनी-शहडोल मार्ग पर भीषण सड़क हादसा: दो बसों की चपेट में आई बाइक, दो छात्रों की दर्दनाक मौत,…
पूरी खबर पढ़ें →
बाघमारा। पंचायत चुनाव से पहले इलाके में सियासी सरगर्मी तेज हो गई है। आरोप-प्रत्यारोप के बीच मंदरा पंचायत…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी( सुरेश सिहाग )पुलिस अधीक्षक रेवाड़ी श्री हेमेंद्र कुमार मीणा, आईपीएस के कुशल निर्देशन में नशीले पदार्थों की…
पूरी खबर पढ़ें →
सुमिता शर्मा चंद्रपूर महाराष्ट्र : राज्य के मान्यता प्राप्त गैर-अनुदानित (निजी) स्कूलों में प्रवेश प्रक्रिया, फीस वसूली और…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।