चिचपल्ली येथे आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृत व्यक्तीचे नाव राजू मनोहर पेटकर
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


चिचपल्ली येथे आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृत व्यक्तीचे नाव राजू मनोहर पेटकर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल पंपासमोरील पप्पी द ढाबा परिसरात दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पप्पी द ढाबा येथील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.
मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्ये कोणतेही ओळखपत्र आढळले नसल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, चिचपल्ली पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून, महादेव विजय तुराडे यांच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली.
मृत व्यक्तीचे नाव राजू मनोहर पेटकर असून तो चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजू पेटकर याचे वय अंदाजे ३२ वर्षे होते.
त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
नातेवाइकांच्या माहितीनुसार, त्याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, राजू पेटकर चंद्रपूरहून चिचपल्ली येथे नेमका कोणत्या कारणासाठी आला होता?
तो घराबाहेर का पडला होता? तसेच त्याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. रामनगर पोलीस पुढील तपास करीत असून, या घटनेमागील परिस्थितीचा शोध घेतला जात आहे.
अज्ञात म्हणून आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असली, तरी राजू पेटकरच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

झालावाड़, 22 नवंबर 2026 वीरांगना झलकारी बाई की जयंती के उपलक्ष में आज झालावाड़ में एक भव्य कार्यक्रम…
पूरी खबर पढ़ें →
लखनऊ। सहारा इंडिया परिवार, साईं प्रसाद ग्रुप, पल्स कंपनी सहित विभिन्न चिटफंड कंपनियों में निवेश करने वाले लाखों-करोड़ों…
पूरी खबर पढ़ें →
कटनी-शहडोल मार्ग पर भीषण सड़क हादसा: दो बसों की चपेट में आई बाइक, दो छात्रों की दर्दनाक मौत,…
पूरी खबर पढ़ें →
बाघमारा। पंचायत चुनाव से पहले इलाके में सियासी सरगर्मी तेज हो गई है। आरोप-प्रत्यारोप के बीच मंदरा पंचायत…
पूरी खबर पढ़ें →
रेवाड़ी( सुरेश सिहाग )पुलिस अधीक्षक रेवाड़ी श्री हेमेंद्र कुमार मीणा, आईपीएस के कुशल निर्देशन में नशीले पदार्थों की…
पूरी खबर पढ़ें →
सुमिता शर्मा चंद्रपूर महाराष्ट्र : राज्य के मान्यता प्राप्त गैर-अनुदानित (निजी) स्कूलों में प्रवेश प्रक्रिया, फीस वसूली और…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।