:
पत्नीला 5 कोटी, मुलाला 1 कोटी! घटस्फोट देताना सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
नवी दिल्लीहून मोठी बातमी समोर आली आहे.
सुप्रीम कोर्टाने एका प्रदीर्घ वैवाहिक वादात विवाह संपुष्टात आणताना पतीला पत्नीला 5 कोटी रुपये आणि मुलासाठी वेगळे 1 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच एकूण 6 कोटी रुपयांची एकरकमी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
काय होतं प्रकरण? दोघांचा विवाह डिसेंबर 1998 मध्ये झाला होता.
मे 2001 मध्ये मुलाचा जन्म झाला आणि जानेवारी 2004 पासून दोघे वेगळं राहत होते. पतीने 2004 मध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती, तर पत्नीने स्वतःसाठी आणि मुलासाठी पोटगीची मागणी केली होती.
हे प्रकरण कुटुंब न्यायालय आणि दिल्ली हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात पोहोचलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, दोघांमध्ये बराच काळापासून तडजोडीची कोणतीही शक्यता नव्हती, विवाह पूर्णपणे तुटला होता.
पत्नी पतीपासून वेगळी राहत होती आणि मुलगा देखील तिच्यासोबतच राहत होता. पतीचं उत्पन्न, मालमत्ता, जीवनमान आणि दोघांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही रक्कम ठरवण्यात आली आहे.
कलम 142 अंतर्गत विवाह संपुष्टात आणण्याचा आदेश दिला आहे. पोटगी ठरवण्यासाठी कोर्टाने 8 महत्त्वाचे आधार सांगितले आहेत.
पती-पत्नीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती, दोघांच्या गरजा, मुलांच्या गरजा, पत्नीचं शिक्षण, पत्नीचं स्वतःचं उत्पन्न, विवाहादरम्यानचा जीवनमान, पत्नीने करिअरचा त्याग केला आहे का, आणि पतीचं उत्पन्न आणि इतर जबाबदाऱ्या. ही रक्कम 4 महिन्यांच्या आत द्यावी लागणार आहे.
हा निर्णय कायमस्वरूपी पोटगी ठरवण्यासाठी एक महत्त्वाचं मार्गदर्शन ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय!
पत्नीला ₹5 कोटी, मुलाला ₹1 कोटी – एकूण 6 कोटींची पोटगी! पोटगी ठरवण्यासाठी 8 नवे नियम जाहीर.
तुमचं मत काय? कमेंट मध्ये सांगा…