Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

जिओ कंपनीच्या महागड्या रिचार्जमुळे ग्राहक त्रस्त! 5G च्या नावाखाली 4G ग्राहकांची गैरसोय; चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात संताप

23 Nov 2026, 10:58 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
ChatGPT Image Sep 17 2026 05 38 13 PM

जिओ कंपनीच्या महागड्या रिचार्जमुळे ग्राहक त्रस्त! 5G च्या नावाखाली 4G ग्राहकांची गैरसोय; चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात संताप

स्वतःला सर्वोत्तम कंपनी म्हणवणाऱ्या जिओकडून ग्राहकांना अपेक्षित इंटरनेट सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

रिलायन्स जिओ कंपनीकडून रिचार्जचे दर वाढवले जात असताना ग्राहकांना मात्र अपेक्षेप्रमाणे इंटरनेट सेवा मिळत नसल्याचा आरोप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मोबाईलधारकांकडून केला जात आहे.

विशेषतः 4G मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. महागडे रिचार्ज करूनही इंटरनेटचा वेग अत्यंत कमी असल्याने अनेक ग्राहकांना इंटरनेट वापरणे कठीण झाले आहे. दुसरीकडे 5G मोबाईलधारकांना इंटरनेट सेवा मिळत असताना 4G ग्राहकांना मात्र वारंवार नेटवर्क आणि स्लो इंटरनेटच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे.

ग्राहकांच्या मते, पैसे भरून रिचार्ज केल्यानंतरही अपेक्षित सेवा मिळत नसेल, तर ग्राहकांनी भरलेल्या पैशांचा उपयोग तरी काय? वारंवार तक्रारी करूनही कंपनीकडून समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.

या त्रासाला कंटाळून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्राहकांनी जिओ सिमकार्ड बंद करून इतर कंपन्यांच्या सिमकार्डकडे वळण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जात आहे.

याशिवाय, रिचार्जची मुदत संपल्यानंतर किंवा ग्राहकाने वेळेवर रिचार्ज न केल्यास सिमकार्ड बंद होण्याची भीती दाखवली जात असल्याच्या तक्रारीही काही ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत.

प्रश्न असा आहे की, ग्राहकांनी पैसे देऊनही योग्य इंटरनेट सेवा मिळवायची नाही का? 5G सेवेच्या जाहिराती आणि प्रचाराच्या काळात 4G ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे?

या संपूर्ण प्रकरणाची केंद्र सरकार, दूरसंचार विभाग (DoT) आणि संबंधित ग्राहक संरक्षण यंत्रणांनी दखल घेऊन जिओ कंपनीच्या नेटवर्क सेवेची गुणवत्ता, रिचार्ज दर आणि ग्राहकांच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील त्रस्त ग्राहकांकडून होत आहे.

ग्राहकांना जाहिराती नकोत, तर पैसे भरल्यानंतर दर्जेदार सेवा हवी!

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

मध्यप्रदेश पुलिस आरक्षक भर्ती परीक्षा 2026 टली 7.50 लाख उम्मीदवारों का बढ़ा इंतजार
Sagar23 Nov

मध्यप्रदेश पुलिस आरक्षक भर्ती परीक्षा 2026 टली 7.50 लाख उम्मीदवारों का बढ़ा इंतजार

सागर, वन्दे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी,8225072664* मध्यप्रदेश में सरकारी नौकरी की तैयारी कर रहे लाखों…

पूरी खबर पढ़ें →
जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश आगर में कौओं की सामूहिक मौत से हड़कंप, बर्ड फ्लू की आशंका; जांच के लिए भोपाल भेजे नमूने
error: Content is protected !!