Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चिचपल्ली गावाच्या विकासाला अखेर मुहूर्त कधी?

24 Nov 2026, 10:19 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चिचपल्ली गावाच्या विकासाला अखेर मुहूर्त कधी? - चंद्रपूर, महाराष्ट्र

Dr.Pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live TV News
चिचपल्ली गावाच्या विकासाला अखेर मुहूर्त कधी? तीन वर्षांपूर्वीच्या पुराच्या जखमा आजही कायम; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा आरोप!

चिचपल्ली : चिचपल्ली गावाला तीन वर्षांपूर्वी आलेल्या भीषण पुरामुळे गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 ला जोडणारा गावातील रस्ता तोडून पुराचे पाणी बाहेर काढण्यात आले होते.

मात्र, तीन वर्षांचा कालावधी उलटूनही तो रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. गावातील तलावाची बांधणी, रस्त्यांची दुरुस्ती, बसस्थानकाची सुधारणा आणि मूलभूत सुविधांचा विकास याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

पुराच्या काळात सर्व राजकीय पक्षांना गावकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरून काढणे शक्य झाले नाही. मात्र, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीने तांदूळ, काही जीवनावश्यक वस्तू आणि भांड्यांचे वाटप करून मदतीचा हात दिला.

प्रशासनाकडून काही नागरिकांना ५ हजार तर काहींना १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. परंतु ही तात्पुरती मदत होती.

गावाचा कायमस्वरूपी विकास आणि नुकसानग्रस्त पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी मात्र आजही प्रलंबित आहे. गावातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणार कोण?

• राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तुटलेला रस्ता अद्याप दुरुस्त का नाही? • गावातील तलावाची बांधणी आणि दुरुस्ती कधी होणार?

• चिचपल्ली बसस्थानकाची दुरवस्था कधी सुधारणार? • गावात सार्वजनिक शौचालयाची सुविधा कधी उपलब्ध होणार?

• स्वच्छता अभियान केवळ कागदावरच आहे का? • कचरा संकलनासाठी कचरा गाडी आणि कचराकुंड्या कुठे आहेत?

• गावात नियमित फवारणी आणि स्वच्छता कधी होणार? • चिचपल्ली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा कधी तयार होणार?

राजकीय नेते आणि प्रशासनाला ग्रामस्थांचा सवाल! ग्रामपंचायत चिचपल्ली, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यापर्यंत गावकऱ्यांच्या समस्या पोहोचणार तरी कधी?

गावाच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? गावकऱ्यांनो, आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नांसोबतच आपल्या मूलभूत हक्कांसाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे. फुटलेल्या रस्त्यांसोबत किती दिवस जगायचे?

मोडकळीस आलेल्या बसस्थानकासोबत किती दिवस प्रवास करायचा? स्वच्छतेच्या अभावात किती दिवस राहायचे?

आज चिचपल्ली गावातील नागरिक प्रशासनाच्या लक्षाची वाट पाहत आहेत. गावाचा विकास हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा विषय नसून प्रत्येक ग्रामस्थाचा मूलभूत अधिकार आहे.

प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि गावाच्या विकासासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. चिचपल्लीचा विकास कधी होणार?

प्रशासनाचे लक्ष कधी जाणार? हाच प्रश्न आज प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात आहे!

जय हिंद! जय सेवा!

जय भीम! जय श्रीराम!

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

માંગરોળ તાલુકા ના શીલ પી એચ સી અને એમની અંડર મા આવતા આરેણા સહિત દસ ગામો મા પોલીયો નાબુદી અભિયાન અંતર્ગત પોલોયો ના ટીપા નાના બાળકો ને પીવડાવવા માં આવેલ
Junagadh23 Nov

માંગરોળ તાલુકા ના શીલ પી એચ સી અને એમની અંડર મા આવતા આરેણા સહિત દસ ગામો મા પોલીયો નાબુદી અભિયાન અંતર્ગત પોલોયો ના ટીપા નાના બાળકો ને પીવડાવવા માં આવેલ

PHC શીલ દ્વારા તારીખ ૨૨/૧૧/૨૦૨૬ પોલિયો નાબૂદી અભિયાન કાર્યક્રમ કરવામાં આવેલ.પ્રાથમિક આરોગ્ય કેન્દ્ર શીલ દ્વારા ૧૦ ગામના ૦…

पूरी खबर पढ़ें →
गडचिरोली: घोट में अपर तहसील कार्यालय को हरी झंडी, आष्टी को इसमें शामिल करने पर भड़का आक्रोश; विधायक पर लगे आरोप
Gadchiroli23 Nov

गडचिरोली: घोट में अपर तहसील कार्यालय को हरी झंडी, आष्टी को इसमें शामिल करने पर भड़का आक्रोश; विधायक पर लगे आरोप

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: महाराष्ट्र सरकार के राजस्व विभाग ने गडचिरोली जिले की चामोर्शी तहसील के घोट में…

पूरी खबर पढ़ें →
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केलं तर खिशाला झळ! दरमहा 10,000 रुपयांपर्यंत निर्वाह भत्ता द्यावा लागणार, अन्यथा होणार कारवाई
चंद्रपुर: भाजपा खेमे में खलबली; पालकमंत्री के खिलाफ सत्ताधारियों ने ही खोला मोर्चा
Chandrapur23 Nov

चंद्रपुर: भाजपा खेमे में खलबली; पालकमंत्री के खिलाफ सत्ताधारियों ने ही खोला मोर्चा

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: चंद्रपुर जिले के पालकमंत्री को हटाने की मांग अब केवल विपक्ष तक सीमित नहीं…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!