
दिनांक :- 23/01/2026
—————–
अहिल्यानगर शहरामध्ये अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार ठिकाणावर व नेवासा येथे अवैध देशी दारु, गावठी दारु अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छाप्यामध्ये 4 गुन्हे दाखल 3,32,240/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त
——————
——————-
मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोउपनि/ अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, सुनिल पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, उत्तरेश्वर मोराळे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन वेगवेगळे पथक रवाना केले.
दिनांक 22/01/2026 रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑनलाईन बिंगो जुगार, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारु व गावठी हातभट्टीची विक्री करणारे इसमांची माहिती काढुन छापे टाकुन खालील कारवाई केली आहे.
अ.क्र. पो.स्टे. गुरनं जप्त मुद्देमाल आरोपीचे नाव
1 कोतवाली गु.र.नं. 52/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे 2,63,300 /- 1) उमेश विठ्ठल राऊत वय- 28 वर्षे रा. सारसनगर अहिल्यानगर
2) सोनु संदिप आजबे वय -19 वर्षे रा. सदर
3) विशाल बापु गोसावी वय- 25 वर्षे रा. केडगांव अहिल्यानगर
4) आकाश भास्कर गोसावी वय -27 वर्षे रा. पिंपळगाव उजैनी ता.जि. अहिल्यानगर
2 तोफखाना गु.र.नं. 49/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125,287,288 कप्रमाणे 44,500/- 1) किरण बबन दंडवते वय- 41 वर्षे रा. परिचय हॉटेलमागे सावेडी ता.जि. अहिल्यानगर
3 नेवासा गु.र.नं.54/2026 दारुबंदी कायदा कलम 65(ई) 11,000/- विजय अशोक चव्हाण वय-38 वर्षे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर
4 नेवासा गु.र.नं.55/2026 दारुबंदी कायदा कलम 65(ई) 1400/- गणेश सोन्याबापु धेडगे वय-25 वर्षे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर
एकुण 04 गुन्हे दाखल 3,32,240/- मुद्देमाल 7 आरोपीविरुध्द कारवाई
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



