A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूर च्या आर्या प्रकाश सुर्वे या विद्यार्थिनीची राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड.

संजय पारधी चंद्रपूर

श्री महर्षी विद्या मंदिर, दाताळा रोड, चंद्रपूर येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी आर्या प्रकाश सुर्वे हिने क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून हिने आपल्या शाळेचे तसेच आपल्या जिल्हयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक केले.
आर्या हिने २४ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये आपल्या खेळाची उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेसाठी (CBSE – WSO) संघात निवड झाली आहे.
ही राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा मध्यप्रदेश येथील शिवस्तुती येथे १ जानेवारी ६ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. आर्याच्या या यशामुळे श्री महर्षी विद्या मंदिर शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
ही शाळेकरीता अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे. या यशाकरिता शाळेचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख दिनेश कोयचाडे, रुपेश बोडे, संजय पारधी , रुचिता आंबेकर , पायल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
या उज्वल यशाकरिता गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक , सचिव दत्तात्रय कंचर्लावार यांच्यासह सर्व सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती , उपमुख्याध्यापिका श्रीमती. निशा मेहता यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Back to top button
error: Content is protected !!