A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठ स्तरीय मैदानी स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या खेळाडूंचे सुयश

संजय पारधी चंद्रपूर
भद्रावती :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आयोजित विद्यापीठ स्तरीय, वार्षिक मैदानी क्रीडा महोत्सव २०२५, दिनांक १८ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयातील खेळाडू यांनी सहभाग घेऊन आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करून उत्कृष्ट कामगिरी करीत एकूण ०५ पदकांची भरघोस कमाई केली. १०००० मीटर धावणे या स्पर्धेत श्रुती कामतवार या खेळाडूने सिल्वर मेडल प्राप्त केले तसेच या स्पर्धेत कीर्ती अराडे या खेळाडूने ब्रांज मेडल प्राप्त केले. २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन धावणे या स्पर्धेत श्रुती कामतवार या खेळाडूने पुन्हा आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ब्रांज मेडल प्राप्त केले, हाफ मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत साक्षी मशाखेत्री या खेळाडूने चौथा क्रमांक प्राप्त केला. गोळा फेक या क्रीडा प्रकारात हरमन सिंग मारबा या खेळाडूने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत ब्रांज मेडल प्राप्त केले. ४ X १०० रिले धावणे या स्पर्धेत श्रुती कामतवार, कीर्ती अराडे, साक्षी मशाखेत्री, संजना रणदिवे, अंजली खोबरे, स्वाती दुरुडकर या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत रिले धावणे या स्पर्धेत ब्रांज मेडल मेडल प्राप्त केले. विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त झाल्याचे श्रेय खेळाडूंनी, आई वडील, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांना दिले. गोंडवाना विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त झाल्याबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, प्रा. डॉ. नरेंद्र दाते, प्रा. चौखे, प्रा. ढोणे, प्रा. वेले, प्रा. वैद्य, प्रा. गजभिये, प्रा. लांबट, प्रा. कापगते, प्रा. दाते, प्रा. बैरम, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!