मुंबई
Trending

◆ जागतिक मैत्री दिनानिमित्त दै. मुंबई मित्र व मैत्री संस्थेच्या वतीने आयोजित कवी संमेलन उत्साहात संपन्न ◆ *‘दै. मुंबई मित्र‌’च्या कार्यालयात कवी कवियत्रींची मांदियाळी* ◆ उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखक प्रा. हेमंत सामंत तर समारंभ अध्यक्ष म्हणून ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या संपादीका कवियत्री अनघा राणे यांची प्रमुख उपस्थिती ◆ अभिजीत राणे यांच्या हस्ते कवी कवियत्रींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित ◆ वरिष्ठ पत्रकार पंकज दळवी व सुरज भोईर यांचा विशेष सत्कार

◆ जागतिक मैत्री दिनानिमित्त दै. मुंबई मित्र व मैत्री संस्थेच्या वतीने आयोजित कवी संमेलन उत्साहात संपन्न ◆ *‘दै. मुंबई मित्र‌’च्या कार्यालयात कवी कवियत्रींची मांदियाळी* ◆ उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखक प्रा. हेमंत सामंत तर समारंभ अध्यक्ष म्हणून ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या संपादीका कवियत्री अनघा राणे यांची प्रमुख उपस्थिती ◆ अभिजीत राणे यांच्या हस्ते कवी कवियत्रींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित ◆ वरिष्ठ पत्रकार पंकज दळवी व सुरज भोईर यांचा विशेष सत्कार

प्रेस वार्ता
विशेष प्रतिनिधी, मुंबई

◆ जागतिक मैत्री दिनानिमित्त दै. मुंबई मित्र व मैत्री संस्थेच्या वतीने आयोजित कवी संमेलन उत्साहात संपन्न
◆ *‘दै. मुंबई मित्र‌’च्या कार्यालयात कवी कवियत्रींची मांदियाळी*
◆ उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखक प्रा. हेमंत सामंत तर समारंभ अध्यक्ष म्हणून ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या संपादीका कवियत्री अनघा राणे यांची प्रमुख उपस्थिती
◆ अभिजीत राणे यांच्या हस्ते कवी कवियत्रींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित
◆ वरिष्ठ पत्रकार पंकज दळवी व सुरज भोईर यांचा विशेष सत्कार
——–

जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून ‌‘दै. मुंबई मित्र‌’ व ‌‘मैत्री संस्था‌’ आयोजित ‌‘कवि संमेलन‌’ गोरेगावस्थित ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या कार्यालयात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे विश्वस्त ज्येष्ठ लेखक, कवी व पत्रकार प्रा. हेमंत सामंत तर समारंभ अध्यक्ष म्हणून ‌‘दै. मुंबई मित्र‌’च्या संपादीका कवियत्री व साहित्यिका अनघा राणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व ‌‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र‌’चे समुह संपादक अभिजीत राणे उपस्थित होते. यावेळी पुढारी वृत्त वाहिनीचे वरिष्ठ पत्रकार पंकज दळवी व मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार व लेखक बाबाजी राणे यांची यावेळी विशेष मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. लि. चे सिईओ अमोल राणे, जी.के गोपाळ, मकरंद वांगणेकर, स्वप्निल वाडेकर, दिपक काळिंगण, राजेश जाधव, घनश्याम आंबोकर, विजय केदासे, प्रकाश जाधव यांनी उपस्थिती लावली.
अभिजीत राणे यांच्या हस्ते यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अभिजीत राणे यांनी उपस्थित कवी व लेखकांना संबोधत करताना, ‌‘दै. मुंबई मित्र‌’चे हे कार्यालय आपल्यासाठी सदैव खुले असून आपण एक कुटुंब आहोत आपण सर्व माझ्या कुटुंबाचे सदस्य आहात. आपले ‌‘दै. मुंबई मित्र‌’ राज्य व केंद्र सरकार च्या अधिकृत यादीवर असून आपण कुटुंब म्हणून त्यासाठी पत्रकार म्हणून लिखान करावे त्यासाठीचे शिफारस माझ्या आई व संपादीका अनघा राणे आपल्याला नक्की देतील. असे यावेळी ते म्हणाले. मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले
संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट विश्वस्त व प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ पत्रकार प्राध्यापक हेमंत देसाई यांनी जगाला मैत्रीची गरज आहे प्रेमाची गरज आहे आपल्या संत म्हणतांनी महामानवांनी आपल्याला नेहमीच प्रेमाचा मैत्रीचा सल्ला दिला आहे त्याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे म्हणून आजच्या या कवी संमेलनाचे विशेष महत्त्व आहे असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष दैनिक मुंबई मित्रच्या संपादिका कवयित्री अनघा राणे यांनी आपली कविता सादर केली व सर्व कवींचे स्वागत केले व बोलताना, मैत्रीने तुम्हाला जिंकता येतं म्हणून मैत्री फार आवश्यक आहे. असे यावेळी त्या म्हणाल्या.
ठाणे सेंट्रल जेलचे माजी अधिष्ठाता जी. के. गोपाळ यांनी भगवान बुद्धाच्या मैत्रीची संकल्पना विशद करून मैत्रीचे महत्त्व सांगितले समाजाला दिशा देण्यासाठी मैत्रीची आवश्यकता आहे असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
कवी संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे मैत्री संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरज भोईर यांचा वाढदिवस खुद्द अभिजित राणे यांच्या उपस्थितीत व सर्व कवीं आणि मान्यवरांकडून साजरा करण्यात आला. या प्रसंगी मैत्री संस्थेचे कार्यकर्ते ऍड. अदिती गायकवाड, ऍड. रोहिणी जाधव, अभिनेत्री निशा जाधव, संतोष भोईर जी, पत्रकार घनश्याम अंबोकर, पत्रकार व कवी गुरुदत्त वाकदेकर, राजेश जाधव, विजय गोडबोले, विजय केदासे, विकास कदम, रोहित पोटे, रेल्वे युनियनचे अध्यक्ष दीपक काळीगंण, रक्तदाता साई रामपूरकर आणि योगशिक्षक-कवी संतोष खरटमोल उपस्थित होते.
सर्व कवी कवित्रींना अभिजीत राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कलावंत साहित्यिक व अनेक कवी कवयित्री उपस्थित होते पूज्य साने गुरुजींच्या 125 जयंती निमित्त खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष नागपूर
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन जिल्हा अध्यक्ष नागपूर

Back to top button
error: Content is protected !!