A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

डॉ. गजेंद्र बनगर मानद विद्यावाचस्पती अवॉर्ड ने सम्मानित

वर्धा: पुलगाव येथील महिला स्वरोजगार प्रशिक्षण, न्यू इंडियन एडुकेशन चे अध्यक्ष डॉ. गजेंद्र बनगर  यांना काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तरप्रदेशमार्फत ‘डॉन बास्को युथ सेंटर’ कोरेगाव पुणे येथे झालेल्या भव्य मानद व उपाधी वितरण सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ”विद्यावाचस्पती” या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले.तसेच काशी विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य संपर्क पदी नियुक्ती करण्यात आली.प्रमुख याप्रसंगी विद्यापीठाचे कुलाधिपती वाराणसीचे
कवी सुखमंगल सिंह, डॉ. संभाजी बाविस्कर, कवी इंद्रजीत तिवारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राज अल्विन देवदास, मुख्य अतिथी डॉ. चंद्रपाल सुकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. गजेंद्र बनगर यांच्या कार्याची प्रशंसा शुभेच्छा दिल्या. डॉ. बनगर यांना मिळालेल्या मानद उपाधीकरिता प्रीतम जामदार, नितीन देशमुख, संजय सोनटक्के, रवी चावरे, बंडू फुलझले,गिरीश मोहरे,अरविंद भिसे,अमोल मिर,सुजित सुरसे यांनी डॉ. गजेंद्र बनगर यांचे अभिनंदन केले.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!