गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


*गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
परभणी(अनिल शेटे) गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून तात्काळ घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज उपविभागीय अधिकारी, आणि गंगाखेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
गंगाखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, एक महिना पासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, कापूस,तुर, मुग, उडीद अन्य पिकांचे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाची अनियमितता व प्रतिकूल परिस्थितीमुळे शेती व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन मासोळी धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे. शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मदत, नुकसानभरपाई व शासनाच्या विविध सवलती जाहीर करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित रामप्रभु मुंडे मा.नगराध्यक्ष गंगाखेड, सुनील ठाकुर माजी उपनगराध्यक्ष गंगाखेड, मनोहर महाराज केंद्रे मा.नगरसेवक गंगाखेड, आजीज खान इम्राहीम खान नगरसेवक न.प.गंगाखेड, अर्जुन पुरनाळे मा.नगरसेवक गंगाखेड, रवि जोशी तालुकाध्यक्ष गंगाखेड, मोहन गित्ते सर, ओमप्रकाश जवळकर, मंचकराव मुंडे, श्यामराव उदावंत, रामदास भेडेंकर सर, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासन व प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे असे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

नागपुर से वंदे भारत LIVE TV NEWS की रिपोर्ट नागपुर अब सिर्फ महाराष्ट्र की उपराजधानी नहीं, बल्कि एक…
पूरी खबर पढ़ें →
प्राप्त हुई जानकारी के अनुसार दैनिक भास्कर के 24 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में नागपुर टेकड़ी श्री…
पूरी खबर पढ़ें →
प्राप्त हुई जानकारी के अनुसार दैनिक भास्कर के 24 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में नागपुर टेकड़ी श्री…
पूरी खबर पढ़ें →
*बल्लारपुर, चंद्रपुर - 20 सितंबर 2026* महात्मा ज्योतिबा फूले महाविद्यालय, बल्लारपुर में शनिवार 20 सितंबर 2026 को राज्य…
पूरी खबर पढ़ें →
बल्लारपुर से वंदे भारत LIVE TV NEWS के लिए संवाददाता की रिपोर्ट अमृत भारत स्टेशन योजना के तहत…
पूरी खबर पढ़ें →
मुंबई हायकोर्ट,नागपुर बेंच की ओरसे, विधी साक्षरता अभियान के राष्ट्रीय आयोजन मे बि.एस.ए.-२३ के साथ ई- इव्हीडंस का…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।