Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिचपल्ली येथे अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव; पत्रकाराला पाहणीसाठी परवानगी नाकारली

02 Nov 2026, 11:22 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिचपल्ली येथे अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव; पत्रकाराला पाहणीसाठी परवानगी नाकारली - चंद्रपूर, महाराष्ट्र

सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिचपल्ली येथे अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव; पत्रकाराला पाहणीसाठी परवानगी नाकारली
चिचपल्ली : येथील सम्राट अशोक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात अस्वच्छता आणि शिस्तीचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. Vande Bharat live tv news न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी डॉ.

पिंटू पाल यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता, परिसरात अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून आला. शाळेच्या आवारात फुटलेल्या काचेचे तुकडे आणि इतर अस्वच्छता आढळून आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळी १० ते ११:३० या वेळेत शाळेत उपस्थित असताना, सकाळी ११:११ वाजताच्या सुमारास अनेक विद्यार्थी व शिक्षक वर्गखोल्यांमध्ये उपस्थित नसून बाहेर फिरताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कालावधीत राष्ट्रगीत किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सामूहिक प्रार्थना अथवा प्रार्थनासभा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नाही.

त्यामुळे शाळेतील दैनंदिन शिस्त आणि शैक्षणिक कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासातील प्रगती, शिक्षकांची उपस्थिती आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण यांची माहिती घेण्याच्या उद्देशाने डॉ.

पिंटू पाल यांनी मुख्याध्यापकांकडे पाहणीची परवानगी मागितली. मात्र, मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे अधिकृत पत्र घेऊन या, त्याशिवाय परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट सांगून पाहणीस परवानगी नाकारल्याचे डॉ.

पॉल यांनी सांगितले. शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज
शाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांची उपस्थिती, नियमित अध्यापन आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती या महत्त्वाच्या बाबींची संबंधित शिक्षण विभागाने प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी.

Vande Bharat live tv न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पिंटू पॉल यांनी केली आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Chandrapur02 Nov

चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात…

पूरी खबर पढ़ें →
પુસ્તક પરબમાં વાંચનપ્રેમીઓની ઉપસ્થિતિ સાથે પુસ્તકદાન અને પુસ્તક સમીક્ષાનો સુંદર કાર્યક્રમ યોજાયો
Gandhinagar02 Nov

પુસ્તક પરબમાં વાંચનપ્રેમીઓની ઉપસ્થિતિ સાથે પુસ્તકદાન અને પુસ્તક સમીક્ષાનો સુંદર કાર્યક્રમ યોજાયો

પુસ્તક પરબમાં વાંચનપ્રેમીઓની ઉપસ્થિતિ સાથે પુસ્તકદાન અને પુસ્તક સમીક્ષાનો સુંદર કાર્યક્રમ યોજાયો માતૃભાષા અભિયાન અને શ્રી અરવિંદ કેન્દ્રના…

पूरी खबर पढ़ें →
49 वर्षीय पवन बिलोरकर 28 अक्टूबर से लापता, परिजनों ने आम नागरिकों से मदद की अपील की
Chandrapur02 Nov

49 वर्षीय पवन बिलोरकर 28 अक्टूबर से लापता, परिजनों ने आम नागरिकों से मदद की अपील की

49 वर्षीय पवन बिलोरकर 28 अक्टूबर से लापता, परिजनों ने आम नागरिकों से मदद की अपील की चंद्रपुर…

पूरी खबर पढ़ें →
जुड़वनिया फुलवार की धरती पर गूंजा वीर लोरिक का शौर्य, मंच पर जीवंत हुई प्रेम और पराक्रम की अमर गाथा
Sonbhadra02 Nov

जुड़वनिया फुलवार की धरती पर गूंजा वीर लोरिक का शौर्य, मंच पर जीवंत हुई प्रेम और पराक्रम की अमर गाथा

फुलवार जुड़वनिया में श्री सरस्वती नाट्यकला मंचन का भव्य समापन, तलवार के एक वार से विशाल शिला को…

पूरी खबर पढ़ें →
RPIC स्कूल के दीपोत्सव में पहुंचे जिला अधिकारी पुलिस अधीक्षक ने मेधावी छात्र-छात्राओं और शिक्षकों को किया सम्मानित
Mahrajganj01 Nov

RPIC स्कूल के दीपोत्सव में पहुंचे जिला अधिकारी पुलिस अधीक्षक ने मेधावी छात्र-छात्राओं और शिक्षकों को किया सम्मानित

RPIC स्कूल के दीपोत्सव में पहुंचे जिला अधिकारी पुलिस अधीक्षक ने मेधावी छात्र-छात्राओं और शिक्षकों को किया सम्मानित…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!