ताडोबात वाघासमोर बाईक थांबवली! एका व्हिडिओसाठी जीव धोक्यात; वन विभागाची चौकशी सुरू
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६ | Dr.pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live TV News
ताडोबात वाघासमोर बाईक थांबवली! एका व्हिडिओसाठी जीव धोक्यात; वन विभागाची चौकशी सुरू
चंद्रपूर : जंगलचा राजा समोर असेल तर रोमांच तर होतोच, पण जर तो राजा तुमच्याकडे चालत आला तर?
ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व्हच्या मोहर्ली बफर क्षेत्रातून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो बघून तुमचा श्वास थांबेल.
शुक्रवार दुपारी रस्त्याच्या कडेला गवतात एक विशाल वाघ आराम करत होता. तिथेच वन विभागाचा चेतावणी बोर्ड लावला होता – इथे वाहन थांबवणे मनाई आहे, उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड.
पण एका हेल्मेटधारी बाईकस्वाराने सगळे नियम धाब्यावर बसवले आणि वाघापासून फक्त काही फुटांच्या अंतरावर बाईक थांबवली.
काही अंतरावर उभ्या असलेल्या बस मधील पर्यटक ओरडून-ओरडून त्याला हटायला सांगत होते, पण त्या साहेबांनी ऐकलंच नाही. आणि मग तेच झालं ज्याची भीती होती.
वाघ उठला आणि रस्त्याच्या दिशेने चालत येऊ लागला. काही क्षण वाघ रस्त्याच्या कडेला फिरत राहिला. सुदैवाने तो पुन्हा उंच गवतात निघून गेला, नाहीतर मोठी अनहोनी झाली असती.
वन विभागाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. मोहर्ली बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या माहितीनुसार चौकशी सुरू झाली आहे. बाईकस्वाराची ओळख पटवली जात आहे आणि नियम उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली जाणार आहे.
संदेश अगदी स्पष्ट आहे. वाघाचं दर्शन घ्या, पण अंतर ठेवून. एका व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालणं ना तुमच्यासाठी योग्य आहे, ना वाघासाठी.
कॅमेऱ्यासमोर वाघ आणि वाघासमोर बाईक – ही बहादुरी नाही, समजदारी दाखवा.
–
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

#एक_साथ_दो_दो_झटके : भरतपुर से कांग्रेस सांसद संजना जाटव को महज दो दिनों में दोहरे झटको का सामना करना…
पूरी खबर पढ़ें →
सागर, वन्दे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी,8225072664* मध्यप्रदेश में सरकारी नौकरी की तैयारी कर रहे लाखों…
पूरी खबर पढ़ें →
इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स से सम्मानित इस रक्तदान शिविर में पिछले वर्ष 207 यूनिट रक्तदान हुआ था, जबकि…
पूरी खबर पढ़ें →
पुराने डिपो क्षेत्र में 25 से 30 कौओं की मौत से दहशत, तीन साल पहले इसी इलाके में…
पूरी खबर पढ़ें →
आगर में मनचले की सरेआम धुनाई! जैन मंदिर के पास युवती से छेड़छाड़ का आरोप, बहनों ने पकड़ा…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsजिओ कंपनीच्या महागड्या रिचार्जमुळे ग्राहक त्रस्त! 5G च्या नावाखाली 4G ग्राहकांची गैरसोय; चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात संताप स्वतःला सर्वोत्तम कंपनी…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।