महात्मा फुले सब्जी मंडीत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात साजरा

महात्मा फुले सब्जी मंडीत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात साजरा
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशन भंडारा च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत महात्मा ज्योतीबा फुले सब्जी मंडी येथे स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
सदर उपक्रम अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाथव, निवासी जिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे, समीर वर्ल्ड कॉम्प्युटर सेंटरचे संचालक समीर नवाज, विनोद चकोले, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर इत्यादींच्या उपस्थित होते.
परिसर स्वच्छत करून नागरिकांना स्वच्छेचे महत्त्व उपस्थित नागरिकांना समीर नवाज यांनी सांगितले आहे.
स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने राष्ट्रीय उद्दिष्ट्ये व सामाजिक विचार गावागावात प्रत्येक जनमाणसात पोहचवून सर्वत्र उत्साहाने पार पाडावा. या उपक्रमांतर्गत जिल्हाभर ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाते. प्रत्येक गावातील लोकांनी एकत्रित येवून ग्राम भावनेनी गाव स्वच्छ व निरोगी करणे यातूनच समाज प्रेम, राष्ट्रप्रेम गावागावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी समाजातील लोकांना जागृत करण्याचा व प्रत्येक गावाला स्वच्छतेतून समृध्दतेकडे नेण्याचा मार्ग सांगितला आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. त्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. ग्राम स्वच्छता अभियानात सर्व जनतेनी उत्साहाने व स्वयंस्फूर्तपणे सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद चकोले, मंगेश गिऱ्हेपुंजे, विनोद आस्वले, अतुल मानकर, सुरेश साखरकर, शेखर बाईक, कमलेश भेदे, नागेश ताईतकर, विनोद सार्वे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशन भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्गानी सहकार्य केले.
**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।





