Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

: चंद्रपूरात गॅस चोरीचा पर्दाफाश! वृंदावन नगरात अवैध रिफिलिंग अड्ड्यावर धाड, ५१ सिलेंडर जप्त

28 Nov 2026, 10:24 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
: चंद्रपूरात गॅस चोरीचा पर्दाफाश! वृंदावन नगरात अवैध रिफिलिंग अड्ड्यावर धाड, ५१ सिलेंडर जप्त - चंद्रपूर, महाराष्ट्र

Dr.Pintu Distric Repoter Vande BharatvLive tv
चंद्रपूर : घरातल्या चुलीसाठी येणाऱ्या गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरच्या वृंदावन नगरमध्ये उघड झाला आहे.

वृंदावन नगरमधील एका गोडाऊनमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा सुरू होता. विशेष म्हणजे गॅस एजन्सीमधून ग्राहकांच्या घरासाठी निघणाऱ्या डिलिव्हरी गाड्या थेट या अड्ड्यावर येत होत्या.

इथे विशेष नोझलच्या साहाय्याने भरलेल्या घरगुती सिलेंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात होता. त्यामुळे ग्राहकांच्या वाट्याला येणाऱ्या सिलेंडरमधून तब्बल २ ते २.५ किलोपर्यंत गॅस कमी दिला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.

या परिसरातील संशयास्पद हालचालींवर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा विभागाला माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने गोडाऊनवर संयुक्त धाड टाकली.

या कारवाईत ४३ घरगुती आणि ८ व्यावसायिक असे एकूण ५१ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच गोपिका इंडियन गॅस असे लिहिलेली टाटा एस गाडीही जप्त केली आहे. हे सर्व सिलेंडर गोपिका इंडियन गॅस एजन्सीशी संबंधित असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३ / ७ अन्वये गुन्हा दाखल होणार असल्याचं अन्नधान्य पुरवठा अधिकारी सुमंत चव्हाण यांनी सांगितलं.

विशेष बाब : ८ दिवसांपूर्वीही याच भागात अशाच अवैध धंद्यावर धाड पडली होती. तरीही ७ दिवसांत पुन्हा हाच धंदा सुरू झाला. त्यामुळे यामागे एजन्सीचा सहभाग असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच आपला आवाज दाबण्यासाठी आमिष दाखवण्यात आल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

पुरवठा विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, डिलिव्हरी बॉयकडून वजन करूनच सिलेंडर घ्यावा. वजन करून देत नसेल तर पुरवठा विभागाकडे तक्रार करावी.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

अंतर्राष्ट्रीय बालविवाह उन्मूलन दिवस पर “बालविवाह को कहे ना” जागरूकता व शपथ कार्यक्रम :-
Pali28 Nov

अंतर्राष्ट्रीय बालविवाह उन्मूलन दिवस पर “बालविवाह को कहे ना” जागरूकता व शपथ कार्यक्रम :-

अंतर्राष्ट्रीय बालविवाह उन्मूलन दिवस पर "बालविवाह को कहे ना" जागरूकता व शपथ कार्यक्रम :- माननीय रालसा,जयपुर के निर्देशानुसार…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Kondagaon28 Nov

तीन दिवसीय प्रतियोगिता में बच्चों ने खेल, बौद्धिक क्षमता और सांस्कृतिक प्रस्तुतियों से बिखेरा जलवा, विधायक नीलकंठ टेकाम ने खिलाड़ियों का बढ़ाया उत्साह

संकुल स्तरीय बाल क्रीड़ा प्रतियोगिता में आँवराभाटा का दबदबा, प्राथमिक वर्ग में तरईबेड़ा और माध्यमिक वर्ग में आँवराभाटा…

पूरी खबर पढ़ें →
समर्थन मूल्य पर जिले में 1 दिसंबर से शुरू होगी धान खरीदी कलेक्टर आशीष तिवारी ने निर्धारित किए 85 उपार्जन केंद्र, 20 जनवरी 2027 तक होगी खरीदी किसानों को मिलेगा…
पकरी में रात्रि के समय धान की कटाई के दौरान पलटा थ्रेसर, चालक बाल-बाल बचा, टला बड़ा हादसा
Sonbhadra28 Nov

पकरी में रात्रि के समय धान की कटाई के दौरान पलटा थ्रेसर, चालक बाल-बाल बचा, टला बड़ा हादसा

विंढमगंज क्षेत्र पकरी (उपेन्द्र कुमार) सोनभद्र:– पकरी गांव में रात्रि के समय धान की कटाई के दौरान अचानक…

पूरी खबर पढ़ें →
किसानों के खेतों तक पानी पहुंचाने वाली नहर का कलेक्टर ने लिया जायजा, गुणवत्तापूर्ण निर्माण के दिए निर्देश किरहाई पिपरिया में निर्माणाधीन एलबीसी नहर का किया निरीक्षण
error: Content is protected !!