Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चांद्रयान आता चांदापासून फक्त १५० किमीवर! आणि आता चांद्रयाननंतर सूर्यानची तयारी, भारत जाणार थेट सूर्यासोबत

29 Nov 2026, 10:25 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चांद्रयान आता चांदापासून फक्त १५० किमीवर! आणि आता चांद्रयाननंतर सूर्यानची तयारी, भारत जाणार थेट सूर्यासोबत - चंद्रपूर, महाराष्ट्र

Dr. Pintu Paul Distric Repoter Vande Bharat Live tv

नवी दिल्ली : चांद्रयानानंतर आता भारताने सूर्याचीही तयारी केली आहे. चांद्रयान चांदाच्या अगदी जवळ पोहोचलंय, तर दुसरीकडे ISRO आता सूर्यान लाँच करण्याच्या तयारीत आहे.

भारताच्या या स्पेसक्राफ्टचं नाव आहे आदित्य L-1.

आदित्य L-1 बेंगळुरूच्या सॅटेलाइट सेंटरमध्ये बनवण्यात आलाय आणि आता तो श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवर पाठवण्यात आलाय. तिथूनच चांद्रयान-३ लाँच झालं होतं, तिथूनच आता आदित्य L-1 लाँच होणार आहे. ISRO पुढच्या महिन्यात याला PSLV रॉकेटने लाँच करू शकतं.

सूर्यान कुठे जाणार?

पृथ्वीपासून सूर्याचं अंतर आहे १५ कोटी किलोमीटर. पण सूर्यान तिथपर्यंत जाणार नाही. तो फक्त १५ लाख किलोमीटर जाणार आणि तिथेच थांबणार.

त्या जागेला म्हणतात लॅग्रेंज पॉईंट. धरती आणि सूर्यातील ती अशी जागा आहे, जिथे कोणतीही वस्तू स्थिर राहते. म्हणून याला अंतराळाचं पार्किंग स्पेस म्हणतात. इथे ग्रहणाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे सूर्यान अडथळ्याशिवाय सूर्याचा अभ्यास करू शकेल.

सूर्यान काय करणार?

• सूर्याच्या बाहेरील थरांचा अभ्यास
• सूर्याभोवतीच्या मॅग्नेटिक फिल्डची स्टडी
• सूर्यावरील वाऱ्याचे कण आणि उष्णतेची माहिती
• ७ पेलोड म्हणजे ७ वैज्ञानिक उपकरणं सोबत नेणार
• वैज्ञानिक कॅमेरा सूर्याचे फोटो काढणार

सूर्याचा अभ्यास करणारं हे भारताचं पहिलंच मिशन आहे. अमेरिकेच्या NASA ने आतापर्यंत १४ सोलर मिशन केली आहेत. आता ISRO पण या क्षेत्रात इतिहास रचायला तयार आहे.

दुसरीकडे चांद्रयानचा धमाका!

ISRO ने तिसऱ्यांदा चांद्रयान-३ ची कक्षा कमी केली आहे. शास्त्रज्ञांनी १८ मिनिटं इंजिन सुरू ठेवलं आणि चांद्रयानला चांदाच्या चौथ्या कक्षेत पोहोचवलं.

आता चांद्रयान चांदापासून फक्त १५० किमी वर आहे. सगळ्यात जास्त अंतर १७७ किमी आहे. आता अंडाकार कक्षेतून गोलाकार कक्षेत चांद्रयान फिरू लागलंय.

• १६ ऑगस्ट : चांद्रयान १०० किमीच्या पाचव्या कक्षेत जाणार
• १७ ऑगस्ट : प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळं होणार
• २३ ऑगस्ट : लँडर चांदावर उतरणार

चांद्रयान-३ ची सर्व यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत. सगळं भारताच्या प्लॅननुसार होतंय. आता फक्त ९ दिवसांनी चांद्रयान चांदाच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आणि तिथे पोहोचणारा भारत पहिला देश बनणार आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

माजी सैनिक तथा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत.संग्राम वाघमारे यांना भारत गौरव पुरस्कार; तथागत मित्र मंडळातर्फे विशेष सन्मान साजीद बागवान/नायगाव तालुका प्रतिनिधी. नरसी.बहुजन शक्ती
Nanded29 Nov

माजी सैनिक तथा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत.संग्राम वाघमारे यांना भारत गौरव पुरस्कार; तथागत मित्र मंडळातर्फे विशेष सन्मान साजीद बागवान/नायगाव तालुका प्रतिनिधी. नरसी.बहुजन शक्ती

माजी सैनिक तथा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत.संग्राम वाघमारे यांना भारत गौरव पुरस्कार; तथागत मित्र मंडळातर्फे विशेष सन्मान साजीद…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!