Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

नांदेडमध्ये कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याचे अपहरण; दोन दिवस डांबून ठेवल्याची तक्रार! खासगी सावकारांच्या मनमानीविरोधात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा कडक इशारा; निर्भीडपणे तक्रार कर

30 Nov 2026, 01:10 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
ChatGPT Image Sep 17 2026 05 38 13 PM

Dr.Pintu Paul Dr.Pintu Paul vande Bharat live tv News

नांदेड : खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला तब्बल दोन दिवस डांबून ठेवल्याची धक्कादायक तक्रार नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी नांदेड शहरातील वझिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी खासगी सावकार आणि वित्तीय संस्थांना कडक इशारा दिला आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली अतिरिक्त व्याजाची मागणी करणे, शेतकऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे, अपहरण करणे किंवा बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे हे फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारच्या अन्यायाला शेतकऱ्यांनी घाबरून न जाता निर्भीडपणे सामोरे जावे. कोणत्याही खासगी सावकाराकडून किंवा वित्तीय संस्थेकडून धमकी, मारहाण अथवा छळ होत असल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कर्जवसुलीच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून कठोर आणि सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सावकारीच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

चंद्रपुर में अनूठा सत्कार: ‘मन की बात’ व जनसेवा के चित्रों से सुसज्जित विशेष शॉल भेंट कर डॉ. सुधीर मुनगंटीवार का भव्य अभिनंदन
Chandrapur29 Nov

चंद्रपुर में अनूठा सत्कार: ‘मन की बात’ व जनसेवा के चित्रों से सुसज्जित विशेष शॉल भेंट कर डॉ. सुधीर मुनगंटीवार का भव्य अभिनंदन

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: चंद्रपुर। देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा देशवासियों से सीधा संवाद स्थापित करने…

पूरी खबर पढ़ें →
रिश्वत लेने का वीडियो वायरल होने के बाद एसआई नेहा सिन्हा निलंबित, विभागीय जांच शुरू
Darbhanga29 Nov

रिश्वत लेने का वीडियो वायरल होने के बाद एसआई नेहा सिन्हा निलंबित, विभागीय जांच शुरू

रिश्वत लेने का वीडियो वायरल होने के बाद एसआई नेहा सिन्हा निलंबित, विभागीय जांच शुरू रिपोर्टर साहिल राज…

पूरी खबर पढ़ें →
ध्वनि प्रदूषण रोकने के लिए पुलिस का ‘सायलेन्स चंद्रपूर’ अभियान , अनधिकृत मॉडिफाइड सायलेन्सर लगाने वाले दुपहिया वाहन चालकों पर होगी सख्त कार्रवाई
दरभंगा में खाकी वर्दी पर लगा शर्म”नाक आरोप! शादी का झांसा देकर 23 वर्षीय युवती के यौ”न शो”षण का आरोप, प्रशिक्षु दारोगा नीतीश कुमार को SSP ने किया सस्पेंड
error: Content is protected !!