
अहिल्यानगर : तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असून, प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी लवकरच ईश्वरी चिठ्ठया काढण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १२२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात ३१२ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. ३३० ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित राहणार असून, यात १६५ महिलांना संधी मिळणार आहे, तर ११९ ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून, ६० ग्रामपंचायतींमध्ये ‘महिलाराज’ असणार आहे. तसेच १५० ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून, यात ७५ महिला सरपंचांना संधी असणार आहे.
पुढील पाच वर्षांचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभागाला प्रवर्गनिहाय टक्केवारी आणि लोकसंख्येचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला होता. २०११ च्या जनगणनेनुसार सादर केलेल्या अहवालात जिल्ह्यात 36 लाख ५३ हजार ३३९ ग्रामीण लोकसंख्या असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. यात ८ लाख २७ हजार १५०ओबीसींची लोकसंख्या असून, त्यांची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी २२. ६४ इतकी आहे. तसेच अनुसूचित जातीची ४ लाख ४७ हजार ६९५ इतकी लोकसंख्या असून, त्यांची टक्केवारी १२. २५ आहे. तर, ३ लाख ५५ हजार ३७४ अनुसूचित जमातीची लोकसंख्या असून, त्याची टक्केवारी ९. ७३ टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सात ग्रामपंचायतींच्या आरक्षणात सुधारणाअ
हिल्यानगर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने आरक्षणात सुधारणा करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील या ७जागांचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ, शिबलापूर, वडगाव पान, नगर तालुक्यातील हमीदपूर, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, पाथर्डी तालुक्यातील भिलवडे, शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.







