A2Z सभी खबर सभी जिले की

खंडाळ्याजवळ अपघात श्रीरामपूरच्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू...

खंडाळ्याजवळ अपघात श्रीरामपूरच्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू...

प्रेस नोट
श्रीरामपूर, अहिल्यानगर

खंडाळ्याजवळ अपघात श्रीरामपूरच्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- तालुक्यातील खंडाळा-नांदूर दरम्यान बाभळेश्वर रोडवर झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या अपघातामध्ये श्रीरामपूरचा तरुण ठार झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीरामपूरकडून संगमनेरकडे निघालेल्या (एम.एच.14 एच.जी. 8314) या क्रमांकाच्या कंटेनरची बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणार्‍या युनिकॉन (एम.एच.17 बी.टी. 4029) दुचाकीची धडक झाली.
यामध्ये मोटार सायकलवरील मनिष सुरेश गायकवाड (वय 26 ) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला. जखमीला स्थानिक तरुणांनी तातडीने कामगार रुग्णालयात पाठविले. दुचाकी चालकाच्या डोक्यावर हेल्मेट असूनही डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर मार लागला.तसेच मॅकव्हिलचे तुकडे झाले.
अपघात घडताच कंटेनरचा चालक पसार झाला होता. पुढील तपास पोलीस नाईक श्री.परबत व किशोर औताडे करत आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!