
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा
पुणे वंदे भारत लाईव्ह न्यूज राजू बावडीवाले दि.१७/०४/२०१९ रोजी दुपारी १२/३० वा.च्या. सुमारास सदर घटना ही वडकी, ता. हवेली, जि. पुणे येथे घडली आहे. यातील आरोपी नामे भिमराव यशवंत खांडे, वय ५५ वर्षे, रा. वडकी, पुणे वाने उसणे पैसे मागण्याच्या कारणावरुन यातील मयत नामे चंद्रकांत शंकर चव्हाण यासे दगड व लाकडी काठीच्या साहाय्याने जिवे ठार मारल्याने लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक २९४/२०१९ भा.दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास सपोनि. दिलीप पवार, यांनी केला व मा. न्यायालयामध्ये मुदतीत आरोपी नामे भिमराव यशवंत खांडे, वय ५५ वर्षे, रा. वडकी, पुणे याचेविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. वरील प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. सदर केसमध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दि.१८/०१/२०२५ रोजी सात वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर केस मध्ये सरकारी पक्षातर्फे सहा सरकारी वकील श्री. नामदेव तरळगट्टी, कोर्ट पैरवी श्रीमती ललिता कानवडे, समन्स वॉरंट अंमलदार प्रशांत कळसकर, नमूद केस दत्तक अंमलदार श्रीमती रेश्मा कांबळे यांनी नमुद गुन्हयाचे कामकाज पाहिले.



