
समीर वानखेडे ब्युरो चीफ:
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कारीडोरमध्ये शासनाने लोहारडोंगरी प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या विरोधात इको प्रो संस्थेचे अध्यक्ष श्री बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग आंदोलनास चांदा इको केअर फाउंडेशन संस्थेतर्फे संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला .
ताडोबा अंधारी कारीडोर प्रकल्पात शासन खनिज उत्खननाकरिता लोहारडोंगरी प्रकल्पाला मंजुरी देऊन येथील वन्य जीवन व वन्यप्राणी संरक्षणाला मोठा धोका उत्पन्न करीत असून चंद्रपूर जिल्ह्यातील वृक्षसंपदा नष्ट करून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात भर टाकीत आहे.
तसेच वन्य जीवन व मानव यांच्या संघर्षात वाढ करीत आहे.
म्हणून लोहारडोंगरी प्रकल्पाला चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचा विरोध असून शासनाने हा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा अशी मागणी इको केअर फाउंडेशन तर्फे करण्यात आली .
आम्ही अन्नत्याग आंदोलनास संपूर्ण समर्थन देत असून शासनाने लवकरात लवकर आपल्या आंदोलनाची दखल घेऊन आपल्या मागण्या मान्य कराव्या ही विनंती करीत आहे, असे समर्थनाचे पत्र चांदा इको केअर फाउंडेशन तर्फे संस्थेचे अध्यक्ष विवेक आंबेकर, सचिव पद्माकर मोरे, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर, अतुल अल्याडवार ,अतुल देवतळे यांनी इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना दिले व या प्रकरणाकरिता चंद्रपूर जिल्हा बंदचे आव्हान करण्यात यावे ही विनंती करण्यात आली.









