A2Z सभी खबर सभी जिले की

नाशिक (Nashik) शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंगमध्ये बुधवारी संध्याकाळी एका चार वर्षांच्या मुलाचा कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गालगत पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये घडली. बापाच्या डोळ्यासमोरच मुलाला चिरडले (Nashik)

नाशिक (Nashik) शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंगमध्ये बुधवारी संध्याकाळी एका चार वर्षांच्या मुलाचा कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गालगत पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये घडली. बापाच्या डोळ्यासमोरच मुलाला चिरडले (Nashik)

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंगमध्ये बुधवारी संध्याकाळी एका चार वर्षांच्या मुलाचा कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गालगत पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये घडली. बापाच्या डोळ्यासमोरच मुलाला चिरडले (Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालक आपल्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये गेला होता. त्याचे वडील व्यवसायाने चालक असून, ग्राहकांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचे काम करतात. हॉटेलमध्ये आल्यानंतर मुलगा वडिलांच्या गाडीतून उतरून पार्किंगमध्ये खेळू लागला. त्याच वेळी, पार्किंगमध्ये आलेल्या दुसऱ्या एका कारचालकाने मुलाला चिरडले. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

 

 

या दुर्घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली. वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये एक कार हॉटेलच्या परिसरात प्रवेश करत असताना, अचानक एक लहान मुलगा समोर धावत जातो. तेच गाडीच्या चाकाखाली येत असल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे.

 

 

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. सदर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

हि दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात…

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!