संगमनेर

महावाचन उत्सव-२०२४ मध्ये आराध्या सिनारे जिल्ह्यात द्वितीय

सोनगाव:शहाजी दिघे

सोनगाव: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आयोजित व रीड इंडिया सेलिब्रेशन यांचे सहकार्यातून समग्र शिक्षा अभियानाच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत महावाचन उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.

या चळवळीचे ब्रँड अँबेसेडर महानायक अमिताभ बच्चन हे होते.या उपक्रमात महाराष्ट्रातील ६६ हजार शाळांनी सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, अवांतर वाचनाची गोडी, सृजनशीलता- भाषा संवाद कौशल्याचा विकास, विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्याची तसेच लेखक- कवींची ओळख व्हावी व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळण्यासाठी हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आयोजित केला होता. 

राहुरी तालुक्यातील धानोरे गावच्या आय.एस.ओ. मानांकीत जि.प. प्राथ. शाळा दिघेवस्ती या आदर्श शाळेने तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते.

 इयत्ता चौथी मधील *आराध्या संदेश सिनारे* हिने वाचन केलेल्या चरित्रपर पुस्तकावर तिने १५० ते २०० शब्दात स्वतःच्या भाषेत विचार मांडले व महावाचन उत्सव २०२४ या पोर्टलवर अपलोड केले. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील इयत्ता तिसरी ते पाचवी या वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवून ती बक्षिसाची मानकरी ठरली आहे. या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मान.श्री. भास्करराव पाटील साहेब,माध्यमिक शिक्षणाधिकारी मान. श्री.अशोक कडूस साहेब,राहुरीचे गटशिक्षणाधिकारी श्री. मोहनीराज तुंबारे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुनराव गारुडकर साहेब, श्रीम. इंदुमती धट मॅडम,श्रीम. सुमनताई सातपुते मॅडम, केंद्रप्रमुख सौ.सरस्वती खराडे मॅडम,धानोरेचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, सांस्कृतिक समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे .

 या स्पर्धेसाठी आराध्या हीस मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे, उपशिक्षक श्री.राजेंद्र बोकंद,श्रीम.विद्याताई उदावंत, श्रीम.सुनिता ताजणे,श्रीम.मनिषा शिंदे,श्रीम.सरगम मोटे मॅडम व वर्गशिक्षक श्री.सोमनाथ अनाप यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Back to top button
error: Content is protected !!