राहाता : शैक्षणिक क्षेत्रातील नवोन्मेष, डिजिटल साक्षरता, भाषिक अभिव्यक्ती आणि प्रशासकीय कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी आयोजित राहाता तालुकास्तरीय शिक्षक, अधिकारी व कर्मचारी स्पर्धा यंदा भव्यदिव्य उत्साहात पार पडल्या. दि. ७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत न्यु इंग्लिश स्कूल पिंप्री निर्मळ आणि पीएम श्री जिल्हा परिषद शाळा शिर्डी (मराठी) येथे तब्बल ४३ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून राहाता तालुक्यातील शैक्षणिक व्यावसायिकांची गुणवत्ता, सर्जनशीलता आणि कार्यक्षमतेचा अनुपम आविष्कार पाहायला मिळाला.
स्पर्धांची संकल्पना प्राचार्य डॉ. राजेश बनकर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर), जिल्हा समन्वयक लक्ष्मण सुपे, संपर्क अधिकारी स्मिता कापसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व विस्तार अधिकारी भाऊसाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली. शिक्षक व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय, स्पर्धात्मकता, सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्य वृद्धींगत करण्याच्या हेतूने या स्पर्धांनी नवा आदर्श निर्माण केला.
स्पर्धा समिती अध्यक्ष राजेश पावसे, सचिव विष्णूकांत कांबळे तसेच सदस्य स्मिता कापसे, कानिफनाथ कोळेकर, ज्ञानेश्वर जाधव, संजय नळे, सुनिल लोमटे, रंगनाथ खेमनर आणि लक्ष्मीकांत इडलवार यांनी संपूर्ण स्पर्धांचे काटेकोर नियोजन करून उत्कृष्ट व्यवस्थापन सिद्ध केले. कार्यक्रमाच्या परिक्षणात डॉ. शरद दुधाट, डॉ. असिफ पठाण, प्रा. शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे, प्रा. भाऊसाहेब थेटे, प्रा. सुनिल कांडेकर, सुनिल लोमटे, प्रतीक्षा काळे आणि निताली रोहोम यांनी उच्च दर्जाचे निकष वापरून निवड प्रक्रियेचे मनोयोगाने काम केले.
दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी विभागस्तरासाठी निवडलेले विजेते पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले. फोटोग्राफी : गायकवाड जयेश दामोधर, पुस्तक परीक्षण : खंडिझोड मिलिंद आनंदराव, कथालेखन : त्रिभुवन शशिभैय्या शामवेल, आत्मचरित्र लेखन : भिंगारदिवे सुरेश, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती : गोसावी वैभव दत्तात्रय, शोधनिबंध : मोरे हरिभाऊ सोपान, पोस्टर बनविणे : दळवी संतोष लक्ष्मण आणि प्रवास वर्णन : आंबेकर दिपाली.
स्पर्धा यशस्वी करण्यात समन्वयक सुनिल लोमटे यांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची विशेष दखल घेण्यात आली. या भव्य प्रतिभोत्सवामुळे राहाता तालुक्यात नव्या ऊर्जा, सर्जनशीलता आणि शैक्षणिक गुणवत्तेची नवी लाट निर्माण झाली असून विभागस्तरावर निवडलेल्या स्पर्धकांकडून उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पांढुर्णा में भीषण आग से किसान की मेहनत राख, 5 एकड़ गेहूं की फसल जली, 100 पाइप भी खाक
12/03/2026
नरसिंहपुर जिले के करेली थाना अंतर्गत 10 मार्च को एक महिला की खेत में मिली लाश हत्या की आशंका को
12/03/2026
पांढुर्णा में बनेगी NABL मान्यता प्राप्त पेयजल परीक्षण प्रयोगशाला — प्रकाश भाऊ उइके की पहल पर मंत्री की सहमति, सुरक्षित पानी की दिशा में बड़ा कदम
12/03/2026
मकरोनिया और कर्रापुर निकायों की समीक्षा बैठक विधायक लारिया ने ली
12/03/2026
भोपाल में मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव से मिली जामसांवली धाम की समिति, हनुमान जन्मोत्सव में आने का दिया आमंत्रण
12/03/2026
इटावा बढ़पुरा इन्डेन गैस एजेसी पर नही हो रही आन लाइन बुकिंग जिससे लोगों मे हडकम्प मच गया जव कि स्टोक मे आज भी 360 सलेंडर वैलेस थे फिर आम जनता परेसान है नही मिल पा रही घरेलू गैस
12/03/2026
3 किलो 360 ग्राम अवैध गांजा के साथ तस्कर को किया गिरफ्तार, एक आरोपी फरार
12/03/2026
खरगोन न्यूज:- मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना का जिले में शुभारंभ, टेमला बना आदर्श ग्राम विकास की पहल का केंद्र
12/03/2026
*अवैध रूप से जंगली भालू का शिकार कर उसकी खाल की तस्करी करने वाले आरोपियों के विरुद्ध गोण्डाहूर पुलिस की बड़ी कार्यवाही।*
12/03/2026
खरगोन न्यूज:- दो दिवसीय कृषि विज्ञान मेले का हुआ शुभारंभ
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!