A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

स्थानिक गुन्हे शाखेकडुन अहिल्यानगर तालुका हद्दीत तिरट जुगाराचे क्लबवर व ऑनलाईन बिंगो अड्यावर छापा, 9 आरोपीकडून 2,01,360/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव 


दिनांक :- 12/01/2026

———————————-

स्थानिक गुन्हे शाखेकडुन अहिल्यानगर तालुका हद्दीत तिरट जुगाराचे क्लबवर व ऑनलाईन बिंगो अड्यावर छापा, 9 आरोपीकडून 2,01,360/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 

—————————-

 मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.

 नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, दिपक घाटकर, विजय पवार, राहुल द्वारके, भिमराज खर्से, आकाश काळे अशांचे पथक नेमुन अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले. 

 दिनांक 11/01/2026 रोजी नेमण्यात आलेले पथक अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नगर दौड रोडवरील जय मल्हार गॅरेजजवळ, अरणगांव येथे काही इसम तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी नगर दौड रोडवरील जय मल्हार गॅरेजजवळ, अरणगांव या ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी एका पत्र्याचे शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले. जुगार खेळणारे इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) धिरज राजेंद्र संदलसे वय -33 वर्षे रा. शिवाजीनगर, केडगांव ता. जि. अहिल्यानगर, 2) नासीर गुलाब खान वय – 58 वर्षे रा. सी.आय.व्ही.सोसायटी, मुकुंदनगर ता.जि. अहिल्यानगर, 3) महेंद्र शिवानंद भांबळ वय- 33 वर्षे रा. सिध्दार्थनगर, ता.जि. अहिल्यानगर, 4) रामदास एकनाथ थोरे वय- 70 वर्षे रा. आरणगाव ता.जि. अहिल्यानगर, 5) ज्ञानेश्वर धनराज गिरवले वय- 48 वर्षे रा. आरणगाव ता.जि. अहिल्यानगर, 6) संजय बाळासाहेब रासकर वय- 50 वर्षे रा. हंगा ता.पारनेर जि. अहिल्यानगर, 7) पोपट मुरलीधर पवार वय-58 वर्षे रा. साकत ता.जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. 

  पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन 12,360/- रू किं. त्यात रोख रक्कम, 1,82,260/-रु कि.च्या 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण 1,94,620 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील आरोपीविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.77/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. 

 तसेच पथकाला नगर दौंड रोडवरील जय मल्हार गॅरेज जवळ अरणगांव येथे काही इसम बिंगो नावाचा हार जितीचा जुगार पैसे लावुन खेळत व खेळवित असल्याची मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे इसम नामे गणेश बाबासाहेब घुले वय -22 वर्षे रा.लोंढे मळा, केडगांव ता.जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, रोख रक्कम असा एकुण 6,740/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याचेविरुध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.28/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकाने नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरील प्रमाणे कारवाया करुन तिरट जुगाराचे क्लबवर व ऑनलाईन बिंगो अड्यावर छापा टाकुन 2,01,360/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असुन यापुढेही सतत अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

 सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!