
प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि
*गटप्रवर्तक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन*
आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवगिरी येथे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यु ) तर्फे भेट घेऊन प्रलंबित असलेले गटप्रवर्तकांचे प्रश्न व आशा वर्कर यांचे प्रश्न निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. गटप्रवर्तकांना घोषणेप्रमाणे १० हजार मानधन वाढ व कंत्राटी कर्मचाऱ्यांमधे समायोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना फडणवीस साहेबांनी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आशा वर्कर यांना घोषणेप्रमाणे सात हजार रुपये मानधन वाढ व १८ इंडिकेटरनुसार देण्यात येणाऱ्या नियमावली ला रद्द करून सरसकट मोबदला देण्यात यावे असे प्रश्न उपस्थित केले असता त्यांनी पुढे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावी. याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली. चर्चा करण्याकरता सीटू तर्फे कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रिती मेश्राम, कॉ.माया कावळे, कॉ. रंजना पौनीकर सह नगरसेवक नागेश सहारे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याकरता मध्य नागपूरचे आमदार विकासभाऊ कुंभारे यांचे मोलाचे योगदान लाभले.
अध्यक्ष
कॉ. राजेंद्र साठे
9890090107
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष देवाशिष टोकेकर