A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

वर्षभर शिक्षकांचा अपमान करणारे संस्थाचालक निकालात मात्र श्रेय घेण्यासाठी समोर.


समीर वानखेड़े :
प्रायव्हेट शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षण संस्था चालक हे शिक्षकांना वारंवार अपमानित करून त्यांचे शोषण करीत आहे. त्यांना शालेय नियमानुसार वेतन तर दिल्या जातच नाही तरी सुशिक्षित बेरोजगारी मुळे अल्प वेतनात काम करणारे शिक्षक बंधू भगिनीचा वारंवार अपमान करण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाही.
या कॉन्व्हेंट शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आणण्यापासून, त्यांच्या फी कलेक्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये व स्पर्धेच्या युगात सर्व स्तरातून टिकण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करीत असते. त्यांच्या प्रयत्नातूनच त्या शाळेतील उज्वल यशाची परंपरा कायम राखण्यास मदत होते.
परंतु तेथील शिक्षण संस्था चालकांना त्याची जराही कदर नसून ते वारंवार शिक्षकांना अपमानित करत त्यांचे शोषण करीत आहे.
त्यांना त्याच्या हक्काचे वेतन नियमानुसार, वैद्यकीय रजा, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ, महिलांना वेतनासह प्रसूती रजा दिली जात नाही.
शासकीय सुट्टी जाहीर असताना सुद्धा अनेकदा शिक्षकांना शाळेत बोलवून शाळेच्या नियमाच्या विरुद्ध अतिरिक्त तास शाळेत ठेवतात.
परंतु निकाल आल्यानंतर हेच अपमानित करणारे शिक्षण संस्थाचालक स्वतःच्या नावासह प्रसिद्धी मिळण्यासाठी केविलवाना प्रयत्न करीत असते.
शासनाच्या नियमाचे पूर्णपणे उल्लंघन करून या शाळा हे शिक्षण संस्थाचालक चालवत असून पैशाचा प्रचंड भ्रष्टाचार करीत आहे. प्रशासनातील व शिक्षण विभागातील काही अधिकारी भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा अवलंब करून यांना संरक्षण देत आहे.
अशा बेकायदेशीर चालणाऱ्या शिक्षण संस्था व त्यांच्या संस्थाचालकांना जिल्हा प्रशासनाने ताबडतोब चौकशी करून अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागाचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!