प्रेस नोट
बेलगाव, भंडारा
*आजचा विद्यार्थी हा भावी देशाचा शिल्पकार – प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे*
*बेलगाव येथील स्नेहसंमेलन उत्साहात साजरा*
भंडारा:- विद्यार्थी मित्रांनो शुन्यातून जग निर्माण करण्यासाठी स्वतः वरील श्रध्दा जपून ठेवणे गरजेचे आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की आयुष्यातील कोणतीही लढाई सहज जिंकता येते. म्हणतात ना, मंजिले उनिको मिलती है, जिनके स्वप्ननो में जान होती है, पंखो में कुछ नहीं होता, होसलो मे उडाण होती है. नशिबाच्या खिडक्या उघडण्यासाठी कष्टाची चाबी वापरावीच लागते. तसेच हे जग एआय चे आहे. त्यात सर्वच गोष्टी सहज शक्य करता येतात. परंतु मशीन कितीही हुशार असली तरी मानवी मनाची व कष्टांची जागा घेऊ शकत नाही. जोपर्यंत मानव आडर देत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही. म्हणून यंत्राच्या या युगात आता तंत्राचा बोलबोला आहे. पण विसरू नका विद्यार्थ्यांनो बुध्दी सव्वा लाखाची आहे. एआय फक्त माहिती देईल पण शहाणपणा तुम्हालाच शिकावा लागेल. आणि यशाच्या शिखरासाठी तुम्हालांच स्वतःचे रक्त आठवावे लागेल. म्हणून आजचा विद्यार्थी हा भावी देशाचा शिल्पकार आहे. असे मार्मिक मत नाट्य अभिनेते, कवी, साहित्यिक प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे यांनी व्यक्त केले.
ते मंगला बहुउद्देशिय शिक्षण संस्था भिलेवाडा द्वारा संचालित कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व इंदिरा आदिवासी प्राथ. शाळा बेलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
स्नेहसंम्मेलन, विज्ञान प्रदर्शनी, हस्तकला प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन नाट्य अभिनेता, साहीत्यिक प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंगला बहु, शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सचिव भजनदास वाढई होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती सदस्य केवळराम मोटघरे, बेलगाव येथील सरपंचा सौ. रिनाताई तुमसरे, भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार कु. प्राची चटप, माजी पं. स. सदस्य रामकृष्ण बेदरकर, सेवानिवृत्त शिक्षक ब्रम्हा मोटघरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, पोलीस पाटील रामुजी वाट, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. एच. मेश्राम, स्नेहा मोटघरे, पालक अमरकंठ मारवाडे, रमेश मसराम, प्रमोद मेश्राम, सुमित आग्रे, कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ओंकार शेन्डे, शाळा विद्यार्थी प्रतिनिधी हिमांशू मसराम, शाळा विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. आरती बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व व्दीप प्रज्वलन, मार्ल्यापण करून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार कु. प्राची चटप हीचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनो जिल्ह्यात शाळा, गावाचे नाव लौकिक तसेच आयुष्याचा पाया मजबूत करण्यासाठी संस्कार, अभ्यासुवृत्ती, जिद्द, आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी केले.
मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन विद्यार्थी -विद्यार्थिनींनी मार्गदर्शन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा समितीचे सदस्य केवळराम मोटघरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कस्तुरबा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य ओंकार शेन्डे, प्रमुख पाहुणे म्हणून मंगला बहु. शि. संस्थेच्या सदस्या श्रीमती शोभाबाई सेलोकर, मांडवी उपसरपंच प्रभाकर सार्वे, बेलगाव उपसरपंच मनोज वळतकर, स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल, महात्मा फुले अभ्यासिकांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका, समुह नृत्य, एकल नृत्य, नक्कल, रेकार्डींग डॉन्स सादर करण्यात आले.
बक्षिस वितरण व माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे उद्घाटन कारधा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक प्रशांत साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्षा सौ. सुमनबाई वाढई होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मंगला बहु. शिक्षण संस्थेचे संस्थापक/सचिव भजनदास वाढई, माटोरा माजी सरपंच किशोर निंबार्ते, मंगला बहु. शिक्षण संस्था भिलेवाडाच्या अध्यक्षा सौ. लताताई बांते, मंगला बहु. शिक्षण संस्थेचे सदस्य केवळराम मोटघरे, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य बेदरकर उपस्थित होते. त्याप्रसंगी कस्तुरबा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक स्व. एस. के. खोलमकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
विशेष म्हणजे परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी, पालक व नागरिकांनी स्नेहसंम्मेलन, विज्ञान व हस्तकला प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक समिती प्रमुख व्ही. झेड. शेन्डे, अहवाल वाचन कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य ओंकार शेन्डे व प्रास्ताविक स्नेहसंम्मेलन प्रमुख विकास धरमशहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सी. टी. ठवकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन मस्के, एच.डी. संग्रामे, एस. पी. खोब्रागडे, कु. एम. एस. भोंदे, धिरज सरकार, गौरव मेश्राम, कु. प्रिती बचेरे, मंगला राघोर्ते, एस. पी. खोब्रागडे, आशिष चौधरी, रवि ठवकर, ए. आर. मस्के, आर. आर. नागपूरे, दिनेश नैताम, सुरेश कठाणे, टी. एन. बान्ते, हितेश वाढई, गोवर्धन बडोले, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015














