Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Bhandara

मौजा मुंडीपार तालुका साकोली येथील प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांसमक्ष पिक पाहणी व पंचनामा करताना दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पीक नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर जिल्हाधिकारी

03 Oct 2026, 10:50 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
मौजा मुंडीपार तालुका साकोली येथील प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांसमक्ष पिक पाहणी व पंचनामा करताना दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पीक नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर जिल्हाधिकारी - भंडारा, महाराष्ट्र

मौजा मुंडीपार तालुका साकोली येथील प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांसमक्ष पिक पाहणी व पंचनामा करताना
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पीक नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर
जिल्हाधिकारी सावनकुमार यांचे प्रत्यक्ष पाहणीसह पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
शासनास नुकसानीचा दावा लवकरच सादर करणार!

विलास केजरकर भंडारा.

भंडारा, दि. २ : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट व शासनाने निर्धारित केलेल्या अन्य निकषांच्या आधारे भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी व लाखांदूर या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद होऊन त्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित यंत्रणांना पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्हाधिकारी सावन कुमार तसेच अपर जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार आणि अन्य अधिकारी प्रत्यक्ष शेतांवर भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत. नुकसानग्रस्त पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून शासनाच्या विहित निकषांनुसार पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनाम्याची कार्यवाही कोणत्याही प्रकारे प्रलंबित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून पीक नुकसानीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार असून, त्याआधारे शासनाकडे नुकसानीचा दावा सादर केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे.

**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

शिक्षण व आरोग्य संस्थांच्या सुधारणांसाठी जिल्हानिहाय कालबद्ध अभियान राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्पकालीन व दीर्घकालीन कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश शाळा, अंगणवाड
Bhandara03 Oct

शिक्षण व आरोग्य संस्थांच्या सुधारणांसाठी जिल्हानिहाय कालबद्ध अभियान राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्पकालीन व दीर्घकालीन कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश शाळा, अंगणवाड

शिक्षण व आरोग्य संस्थांच्या सुधारणांसाठी जिल्हानिहाय कालबद्ध अभियान राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्पकालीन व दीर्घकालीन कृती आराखडे तयार…

पूरी खबर पढ़ें →
गांधी एवं शास्त्री जयंती पर कोषागार में श्रद्धाजाले अर्पित वरिष्ठ कोषाधिकारी ने दोनों महापुरुषों के आदर्शों को शासकीय जीवन में आत्मसात करने का किया आह्वान
Hamirpur03 Oct

गांधी एवं शास्त्री जयंती पर कोषागार में श्रद्धाजाले अर्पित वरिष्ठ कोषाधिकारी ने दोनों महापुरुषों के आदर्शों को शासकीय जीवन में आत्मसात करने का किया आह्वान

रिपोर्टर समसुद्दीन अली शेख, हमीरपुर दिनांक: 02 अक्टूबर, 2026 *गांधी एवं शास्त्री जयंती पर कोषागार में श्रद्धांजलि अर्पित*…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
A2Z सभी खबर सभी जिले की03 Oct

अनुमंडलीय अस्पताल नगर ऊंटरी में श्रद्धा से मनाई गई गांधी जयंती

अनुमंडलीय अस्पताल नगर ऊंटरी में श्रद्धा से मनाई गई गांधी जयंती सत्य, अहिंसा और सादगी के मार्ग पर…

पूरी खबर पढ़ें →
तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे उठा जे-झी का सैलाब.!
Mumbai02 Oct

तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे उठा जे-झी का सैलाब.!

मुंबई:- अकोला प्रतिनिधी :-डॉ.पंजाबराव खाडे. तिरंगे के निचे ईलेक्शन कमिशन के धांदली के विरोध मे मुंबई दादर मे…

पूरी खबर पढ़ें →
जंतर मंतर पर लोकतांत्रिक तरिकेसे आवाज ऊठानेवालो छात्रा को किया पुलिस द्वारा डिटेन.!
Central02 Oct

जंतर मंतर पर लोकतांत्रिक तरिकेसे आवाज ऊठानेवालो छात्रा को किया पुलिस द्वारा डिटेन.!

जजंतर मंतर पर लोकतांत्रिक तरिकेसे आवाज ऊठानेवालो छात्रा को किया पुलिस द्वारा किया डिटेन.! पोलिस की बस से…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Ahmednagar02 Oct

प्रवरेच्या मैदानावर राष्ट्रीय क्रीडा थरार! देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे संघ आमनेसामने

लोणी, दि. २ : वैद्यकीय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रवरा अभिमत विद्यापीठ, लोणी येथे…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!