धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धारावीच्या वर्तमानासह नव्या भविष्याचेही ‘आधुनिक दर्शन’ होणार!

धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे धारावीकरांमध्ये विश्वासनिर्मिती होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धारावीच्या वर्तमानासह नव्या भविष्याचेही ‘आधुनिक दर्शन' होणार!
विलास केजरकर भंडारा.
मुंबई, दि. २ : ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहायला मिळणार नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील घराचा, परिसराचा आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना व्यक्त केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा तसेच भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल दर्शन घडविणारे अत्याधुनिक ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले. पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसीजवळ उभारलेल्या या केंद्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
यावेळी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालिवाल, धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी विशेष उद्देश कंपनी अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना तसेच अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी आदी उपस्थित होते.
केंद्राची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही; ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथे कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच अन्य लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, धारावी पुनर्निर्माण प्रकल्प नेमका कसा असेल, आजची धारावी कशी आहे आणि भविष्यात तिचे स्वरूप कसे बदलणार आहे, याची ‘रिअल टाइम’ माहिती ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये सर्वांना मिळणार आहे. पुनर्विकासानंतर आपले काय होणार, हा धारावीकरांच्या मनातील प्रश्न आणि त्यासंबंधीचा संभ्रम दूर करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धारावीतील रहिवाशांना मिळणारी घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र नागरिक, हितधारक आणि देशभरातील नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
धारावी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आधुनिक दृश्य-श्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील स्वरूपापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे. या संपूर्ण केंद्राची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी गायिलेल्या, बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग आणि ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
[03/10, 07:01] devashishtokekar05: **All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।





