Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले हुतात्मा क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्यावर उद्या विशेष व्याख्यानमाला

31 Oct 2026, 10:08 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले हुतात्मा क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्यावर उद्या विशेष व्याख्यानमाला - चंद्रपूर, महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले हुतात्मा क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्यावर उद्या विशेष व्याख्यानमाला

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्षाचा अमिट ठसा उमटविणारे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले हुतात्मा क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मातोश्री विद्यालय सभागृह, तुकूम, चंद्रपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत विविध विषयांवर मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

या कार्यक्रमात अभ्यासक डॉ. योगेश दुधपचारे हे ‘क्रांतीवीर बाबुराव शेडमाके : स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि वर्तमान स्थिती’ या विषयावर पहिले व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. तर प्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम या ‘क्रांतीवीर बाबुराव शेडमाके : गोंडवाना स्वाभिमानाचा विद्रोही जागर’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोंडी, आदिवासी कला, साहित्य व संस्कृतीचे अभ्यासक राजेश मडावी भूषविणार आहेत.

क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आदिवासी समाजाचा स्वाभिमान आणि सांस्कृतिक अस्मिता नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही व्याख्यानमाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या ऐतिहासिक व वैचारिक कार्यक्रमाला आदिवासी समाजातील बंधू-भगिनींसह इतिहासप्रेमी, विद्यार्थी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश सालरिया का कामधेनु गौ-अभयारण्य: 8 हजार गोवंश का सहारा बना देश का पहला शासकीय गौ-अभयारण्य 472 हेक्टेयर में फैला संरक्षण का अनूठा केंद
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश डेढ़ घंटे की तलाश के बाद मिली सात साल की मासूम, पुलिस ने सुरक्षित परिजनों को सौंपा घर के बाहर खेलने निकली थी बालिका, अचानक हुई लापता
जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश गांधी उपवन में गूंजा मध्यप्रदेश का गौरवगान, लोकसंस्कृति की छटा ने मोहा मन
Agar-Malwa01 Nov

जिला रिपोर्टर सुरेश चौहान आगर मालवा मध्य प्रदेश गांधी उपवन में गूंजा मध्यप्रदेश का गौरवगान, लोकसंस्कृति की छटा ने मोहा मन

*स्थापना दिवस समारोह में छात्राओं पर बरसी प्रोत्साहन राशि, सांसद ने प्रत्येक छात्रा को दिए 1100 रुपए; किसान…

पूरी खबर पढ़ें →
રાજુલા નજીક આવેલ બાલાનીવાવ ખાતે લોખંડી પુરુષ સરદાર વલ્લભભાઈ પટેલ ની ૧૫૧ મી જન્મજયંતિ નિમિત્તે SRP GROUP શપથ ગ્રહણ એકતા પરેડ સાથે હથિયાર નિર્દેશન નું કાર્યક્રમ યોજાયો
Amreli01 Nov

રાજુલા નજીક આવેલ બાલાનીવાવ ખાતે લોખંડી પુરુષ સરદાર વલ્લભભાઈ પટેલ ની ૧૫૧ મી જન્મજયંતિ નિમિત્તે SRP GROUP શપથ ગ્રહણ એકતા પરેડ સાથે હથિયાર નિર્દેશન નું કાર્યક્રમ યોજાયો

યોગેશ કાનાબાર રાજુલા રાજુલા નજીક આવેલ બાલાનીવાવ ખાતે લોખંડી પુરુષ સરદાર વલ્લભભાઈ પટેલ ની ૧૫૧ મી જન્મજયંતિ નિમિત્તે…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!