Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चंद्रपूर शहरात खळबळ! प्रियदर्शनी चौकात प्रतिमेमागे आढळले पुरुषाचे शीर, रेल्वे अंडरब्रिजखाली सापडले धड

18 Nov 2026, 11:57 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चंद्रपूर शहरात खळबळ! प्रियदर्शनी चौकात प्रतिमेमागे आढळले पुरुषाचे शीर, रेल्वे अंडरब्रिजखाली सापडले धड - चंद्रपूर, महाराष्ट्र

चंद्रपूर शहरात खळबळ! प्रियदर्शनी चौकात प्रतिमेमागे आढळले पुरुषाचे शीर, रेल्वे अंडरब्रिजखाली सापडले धड

घटना समोर आली आहे.
शहरातील मुख्य चौकातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेमागे एका पुरुषाचे शीर आढळून आले. गर्दीच्या भागात अशी घटना घडल्याची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच डायल ११२ वर कळवण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती निकुरे, एसडीपीओ प्रमोद चौगुले, अमोल काचोरे यांच्या टीमसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला. पुरावे सुरक्षित राहावेत म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला.
परिसरात सघन तपासणी केली असता रेल्वे अंडरब्रिजखाली त्या पुरुषाचे धड आढळून आले.
प्राथमिक तपास आणि मृतदेहाची स्थिती पाहता मृत्यू सुमारे २ ते ३ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच रेल्वे अंडरब्रिजजवळ पडलेल्या मृतदेहापासून शीर एखाद्या भटक्या कुत्र्याने ओढून प्रतिमेजवळ आणले असावे, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील अचूक माहिती समोर येणार आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

फतेहपुर में कब्रिस्तान से बुजुर्ग का शव बरामद, हत्या या हादसा।
Fatehpur18 Nov

फतेहपुर में कब्रिस्तान से बुजुर्ग का शव बरामद, हत्या या हादसा।

रिपोर्ट सुमित पासवान वंदे भारत फतेहपुर - हुसैनगंज थाना क्षेत्र से बुधवार सुबह एक सनसनीखेज मामला सामने आया…

पूरी खबर पढ़ें →
नवागत एडीओ पंचायत भूदेव सिंह ने संभाला कार्यभार, प्रीतम श्रीवास्तव को भावभीनी विदाई
Gonda18 Nov

नवागत एडीओ पंचायत भूदेव सिंह ने संभाला कार्यभार, प्रीतम श्रीवास्तव को भावभीनी विदाई

कटरा बाजार (गोंडा)। विकासखंड कटरा बाजार में नवागत एडीओ पंचायत भूदेव सिंह ने बुधवार को कार्यभार ग्रहण किया।…

पूरी खबर पढ़ें →
घुग्गुस येथील लॉयड्स मेटल्सच्या पॉवर प्लांटमध्ये ठेका मजुराचा मृत्यू; ड्युटी ड्रेस बदलल्याच्या कथित प्रकारामुळे संशयाचे वातावरण
Chandrapur18 Nov

घुग्गुस येथील लॉयड्स मेटल्सच्या पॉवर प्लांटमध्ये ठेका मजुराचा मृत्यू; ड्युटी ड्रेस बदलल्याच्या कथित प्रकारामुळे संशयाचे वातावरण

घुग्गुस येथील लॉयड्स मेटल्सच्या पॉवर प्लांटमध्ये ठेका मजुराचा मृत्यू; ड्युटी ड्रेस बदलल्याच्या कथित प्रकारामुळे संशयाचे वातावरण घुग्गुस (चंद्रपूर)…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!