Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Chandrapur

चिचपल्ली गावातील NH-930 महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा!

21 Nov 2026, 11:55 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
चिचपल्ली गावातील NH-930 महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा! - चंद्रपूर, महाराष्ट्र

चिचपल्ली गावातील NH-930 महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा! राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पाहणी; अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीला नोटीस देण्याचे निर्देश
चिचपल्ली : चिचपल्ली गावातून जाणाऱ्या NH-930 राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अभियंते व कंत्राटदार यांनी चिचपल्ली गावात प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. यावेळी महामार्गाचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे काही दुकानांचे अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याने चिचपल्ली ग्रामपंचायतीने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस जारी करावी, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून देण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महावितरण विभागाला आवश्यक सहकार्य करण्याबाबत निवेदन देण्यात येणार असून, रस्त्याच्या लांबी व रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे हटविण्यासाठी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी दिली.

झाडे हटविल्याशिवाय रस्त्याचे काम पुढे नेण्यात अडचणी येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिचपल्ली गावातील नागरिकांकडून या रुंदीकरणाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि संबंधित विभागांनी वेळेत सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सर्व आवश्यक परवानग्या व प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास महामार्गाचे काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र, रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली झाडे तोडण्यास वनविभाग परवानगी देणार का, याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आणि चिंता कायम आहे. अपघातांचा वाढता धोका; रुंदीकरणाची तातडीची गरज
सध्या चिचपल्ली गावातील NH-930 रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

अरुंद रस्ता आणि खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेक नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग, ग्रामपंचायत, महावितरण आणि वनविभाग यांनी समन्वय साधून रस्त्याच्या रुंदीकरणातील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणत्याही कारणामुळे काम रखडू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी चिचपल्ली येथील नागरिकांकडून होत आहे.

आता तरी चिचपल्लीकरांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

पूर्व मंत्री चौधरी फूलचंद मुलाना का निधन प्रदेश के लिए अपूर्णीय क्षति : विजय सोमाणी
Rewari21 Nov

पूर्व मंत्री चौधरी फूलचंद मुलाना का निधन प्रदेश के लिए अपूर्णीय क्षति : विजय सोमाणी

रेवाड़ी( सुरेश सिहाग ) हरियाणा के पूर्व कैबिनेट मंत्री और प्रदेश कांग्रेस के पूर्व अध्यक्ष चौधरी फूलचंद मुलाना…

पूरी खबर पढ़ें →
चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.
Chandrapur21 Nov

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.

चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काल संध्याकाळी चंद्रपूर शहरातील मुलींच्या निरीक्षणगृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्या होत्या.…

पूरी खबर पढ़ें →
आजाद चौक की ऑयल पेंट दुकान में भीषण आग, निगम के दमकल अमले ने एक घंटे की मशक्कत के बाद पाया काबू रात 9:09 बजे सूचना मिलते ही मौके पर पहुंची फायर ब्रिगेड, छह राउंड पानी की बौछार से
चंद्रपुर में आपत्तिजनक वीडियो के नाम पर ब्लैकमेल कर विवाहिता से तीन साल तक दुष्कर्म; तीन आरोपियों के खिलाफ मामला दर्ज
Chandrapur21 Nov

चंद्रपुर में आपत्तिजनक वीडियो के नाम पर ब्लैकमेल कर विवाहिता से तीन साल तक दुष्कर्म; तीन आरोपियों के खिलाफ मामला दर्ज

समीर वानखेडे ब्युरो चीफ: महाराष्ट्र के चंद्रपुर शहर से एक बेहद चौंकाने वाला और शर्मनाक मामला सामने आया…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Garhwa21 Nov

गढ़वा में मैट्रिक-इंटर परीक्षा फॉर्म के नाम पर अधिक वसूली करने वाले स्कूलों पर होगी सख्त कार्रवाई

गढ़वा में मैट्रिक-इंटर परीक्षा फॉर्म के नाम पर अधिक वसूली करने वाले स्कूलों पर होगी सख्त कार्रवाई उपायुक्त…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!