प्रेस नोट
मुंबई
विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट ! आजपासून बारावीचे हॉल तिकीट ऑनलाइन जाहीर; येथे करा डाउनलोड |HSC Board Exam HSC Hall Ticket 2026
January 13, 2026, source by : Pratiksha
HSC Board Exam HSC Hall Ticket 2026: तुम्ही बारावीला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज, १२ जानेवारी २०२६ पासून HSC च्या अधिकृत वेबसाईटवर बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. फेब्रुवारी- मार्च २०२६मध्ये होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांपुर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आज, १२ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
मंडळाच्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीटे डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट विद्यार्थ्यांना द्यावे, अशी स्पष्ट सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आला आहेत.
बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याज्ञापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.
फोटो असलेल्या प्रवेशपत्रावर अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का असल्याशिवाय ते वैध मानले जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. हॉल तिकीट नसल्यास परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान, १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) घेतली जाणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षा याच कालावधीत पार पडणार आहेत. यापूर्वी, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहेत.
या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in ओपन करा.
नंतर, होमपेजवर “HSC Hall Ticket 2026” लिंक शोधून क्लिक करा.
नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरून लॉगिन करा.
स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल; त्याची काळजीपूर्वक तपासणी करा.
हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंटआउट काढा.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
















