A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा नागपूर ची वर्ष 2024-2025 कालावधीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 27/12/2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर येथे श्री नारायण समर्थ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

प्रसिद्धी पत्रक
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कार्यालय
सिव्हिल लाईन, नागपूर

*कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी* *संघटना जिल्हा नागपूर*

दि.27/12/2025

कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा नागपूर ची वर्ष 2024-2025 कालावधीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 27/12/2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर येथे श्री नारायण समर्थ यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे श्री अशोक दगडे, श्री ज्ञानेश्वर महल्ले राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य, श्री बुधाजी सुरकर सचिव अखिल भारतीय पेन्शनर फेडरेशन उपस्थित होते.

सचिव पुरुषोत्तम मिलमिले कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा नागपूर यांनी संघटनेच्या कार्याचा संपूर्ण अहवाल आणि जमाखर्च पत्रक सन 2024- 2025 सभेसमोर सादर करून मंजूर करण्यात आले.

सभेमध्ये निवृत्तीवेतनधारक यांचे प्रश्न तसेच शासनाकडे करावयाच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. निवृत्तीवेतन अंश राशीकरणाची पूर्ण स्थापना कालावधी कमी करणे, २०१६ पूर्वीच्या व नंतरच्या वेतनधारकाच्या निवृत्ती वेतनातील तफावत कमी करणे,विधी व न्याय विभागाचे धरतीवर वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीची सवलत लागू करण्यात यावी व त्याचा लाभ देण्यात याव.

तसेच अति उत्कृष्ट काम करणाऱ्यांना वेतन वाढीच्या शासन निर्णयाचे पुनर्विलोकन करणे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना तीन लाभाच्या १०-२०-३० सुधारित सेवा अंतर्गत प्रगती योजना लागू करण्यात येऊन वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा इत्यादी विषयावर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रल्हाद शेंडे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे श्री अशोक दगडे, ज्ञानेश्वर महल्ले ,अध्यक्ष श्री नारायण समर्थ यांनी सभेला मार्गदर्शन केले. सभेचे आभार प्रदर्शन श्री नरेश मोरे यांनी केले .

ही सभा यशस्वी करण्याकरिता डॉ.दिलीप खोरगडे,प्रल्हाद शेंडे नरेश मोरे , नाना कडबे,मधुकर दहीकर, सुनील व्यवहारे, यशवंत कडू,केशव शास्त्री ,प्रकाश मामुलकर ,त्र्यंबक लवणकर, मोरेश्वर उपाशे, मंगेश कडू यांनी सहभाग घेतला.

पुरुषोत्तम मिलमिले

सचिव
कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना
जिल्हा नागपूर

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!