
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हास्तरीय आंतरशालेय ग्रापलिंग स्पर्धा शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी पॅंथर स्पोर्ट्स अकॅडमी चंद्रपूर येथे पार पडली या स्पर्धेत जिल्हयातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, सॅट पाँल स्कूलचे व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले नेहाली युद्धके , श्रेया अष्टेकर , अलीना शेख ,श्रद्धा बुरांडे, समृद्धी साळवे , आयुष भडके, हर्षान शेख , प्राजक भगत, प्रशिक कांबळे, प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले,
गौरव शिवणकर द्वितीय प्रथम क्रमांक पटकाविला त्यामुळे विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे त्यांच्या यशाबद्दल संस्थेतर्फे यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक अविनाश खैरे संचालिका नीना खैरे यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मेणका भंडुला यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक मनोज डे , प्रमोद वासेकर यांनी मार्गदर्शन केले