
संजय पारधी
चंद्रपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला तथा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मूर्तीजापुर जि. अकोला
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्णपदकासह केली कांस्यपदकांची लयलुट…
क्रीडा विभागा अंतर्गत राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मूर्तीजापुर या ठिकाणी दिनांक 20 ते 22 जानेवारी 2026 या कालावधी करण्यात आले होते.
सदर स्पर्धेकरिता नागपुर विभागाचा संघ सहभागी झाला असून प्रथमच नागपूर विभागास 5 सुवर्ण 3 रोप्य 5 कांस्यपदक प्राप्त झाले आहे त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यास पहिल्यांदा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे मानांकन सलोनी कुंभारे आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा मिळून दिले आहे
त्याचप्रमाणे तीन कांस्यपदक शालेय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्राप्त केले आहे.
*मुलांमध्ये*
यशवंतराव शिंदे विद्यालयाचा विधाता लांडगे,
*मुलींमध्ये*
इन्स्पायर कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथील कुमारी श्लेषा बतखल
दिशा सायन्स कॉमर्स आर्ट्स कनिष्ट महाविद्यालयाची कुमारी गार्गी भोयर
या खेळाडूंनी कांस्यपदक प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे.
त्यापैकी राज्यस्तरावर सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेली सलोनी कुंभारे ही आगामी होणाऱ्या *69 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बंगळूर कर्नाटक येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे*
महाराष्ट्र शासनाच्या बॉक्सिंग क्रिडा प्रकारात संघ प्रशिक्षक म्हणून लता इंदूरकर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुलींच्या संघांची मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आली आहे.
खेळाडूंच्या या भरघोस यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील प्रशिक्षक लता इंदूरकर, पंकज शेंडे, महेश आळे, विजय डोबाळे राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद, महाराष्ट्र बॉक्सिंग च्या एड हॉक कमिटीचे समन्वयक डॉ. राकेश तिवारी, चंद्रपूर जिल्हा सचिव अमर भंडारवार, कार्यकारी सचिव प्रा.संगीता बांबोडे, यांना दिले आहे चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना तर्फे सर्व पदक प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले आहे..


