
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील मराठी विभाग प्रमुख सहायक प्राध्यापक सतीश
सहदेवराव कर्णासे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला होता.”१९९० नंतरच्या साहित्य अकादमी पुरस्कृत मराठी कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास”हा त्यांच्या संशोधण्याचा विषय होता. मार्गदर्शक म्हणून तायवाडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महादुला, कोराडी येथील प्रा. डॉ.कोमल वी.ठाकरे लाभले होते. मौखिक परीक्षेला बहीस्त परीक्षक म्हणून एस. एन. डी. टी. विद्यापीठ मुंबई येथील प्रा. डॉ. सुनील रामटेके उपस्थित होते.
आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजयभाऊ सू.कायरकर, उपाध्यक्ष राजुभाऊ चिताडे, अंकितभाऊ कायरकर, डॉ.रजत मंडल प्र प्राचार्य तसेच महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी कर्मचारीनी अभिनंदन केले