A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्या मंदिर येथे ‘हिंदी सप्ताह’ आणि ‘हिंदी दिवस’ आणि साजरा

 

संजय पारधी चंद्रपूर
चंद्रपूर : श्री महर्षी विद्या मंदिर,दाताळा मेन बिल्डिंग,चंद्रपूर येथे मोठ्या थाटात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रीलक्ष्मी मूर्ती मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती निशा मेहता मॅडम आणि हिंदी विभागाच्या प्रमुख श्रीमती सुदीप्ता आसुटकर मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. हिंदी भाषेचं महत्त्व सांगणारे सुमधुर गीत इयत्ता वर्ग सहावी,सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर दहावीच्या आर्यही पाडेवार या विद्यार्थिनीने हिंदी दिवसाचे महत्त्व सांगणारे भाषण सादर केले.त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्याचे सादरीकरण करून सगळ्यांना मोहित केले. हिंदी दिवसाच्या निमित्ताने इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांची गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.त्यांनी सुद्धा स्वतःच्या सुमधुर आवाजात गीतांचे गायन केले आणि उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी हास्यव्यंग आणि मनोरंजन या दोन्हींच्या माध्यमातून एक नवीन आविष्कार सगळ्यांच्यासमोर सादर केला. हिंदी भाषेत वर्णमालेचे महत्त्व सादर करणारी एक सुंदर नाटिका इयत्ता वर्ग सहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अप्रतिमरित्या सादर करून सगळ्यांच्या कौतुकास ते पात्र ठरले.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत समूहगीत सादर केले, पहिलीच्या विद्यार्थ्यांनी बालगीत सादर केले, दुसरीची विद्यार्थिनी श्रीशा भोयर हिने वेशभूषा करून भाज्यांवर आधारित गाण सादर केल, चौथीच्या विद्यार्थ्यांनी मात्रांवर आधारित नाटिका उत्तमपणे सादर केली तसेच दोहे पाठांतर करण्याच्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी सहभाग घेतला, वर्ग तिसरीचा विद्यार्थी प्रवीर वनकर यांनी हिंदी दिवसाच्या निमित्ताने सुंदर गीत सादर केले,पाचवीची विद्यार्थिनी कु.संभवी विश्वकर्मा हिने हिंदी दिवसाच्या निमित्ताने भाषण सादर केले, वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘मोबाईलची सवय व दुष्परिणाम ‘यावर सुंदर नृत्य सादर केले.
गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री.गिरीश चांडक,सचिव श्री. दत्तात्रय कंचर्लावार,इतर संस्थेच्या सदस्यांनी सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिका यांनी हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले आणि आपले विचार व्यक्त करून सगळ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कु.वंशिका बोधलावार आणि विरेन डांगे या नववीच्या विद्यार्थ्यांनी तर आर्ची बच्चनपल्लीवार वर्ग पाचवी,अनविका ढवस आणि सीयोना खांडरे वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले .आभार प्रदर्शन कु.धनश्री तल्हार या वर्ग नववीच्या विद्यार्थिनीने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व हिंदी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली व मोलाची भूमिका बजावली.त्याशिवाय कला शिक्षक, क्रीडा शिक्षकांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

Back to top button
error: Content is protected !!