
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूर येथील १७ वर्ष वयोगटातील व्हॉलीबॉल संघाने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. विजयी संघाचे चंद्रपूर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाऊराव झाडे सर तसेच माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूर चे प्राचार्य श्री शैलेश झाडे सर यांच्याकडून विजयी संघाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आणि याव्हॉलीबॉल संघ खेळात भाग घेणाऱ्या विद्यार्थिनीं श्रेया रामटेके, कोमल बावरी, आयुषी फुलझले, गौरी निषाद, अक्षरा गुंजारे, नंदिनी मून, दीक्षा जगताप आणि भाविका जीवतोडे यांचे कौतुक करण्यात आले आणि विजयी संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.