






पुणे :
दि. 11 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल फालेनगर दत्तनगर रोड आंबेगाव पुणे 46. या ठिकाणी 10 दिवस सकाळी 11 ते 6 दरम्यान हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून हे सर्वांसाठी अगदी निशुल्क आहे. यामध्ये 29 प्रकारच्या वेदना जसे की गुडघेदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, मांडीदुखी यासह 39 प्रकारचे गंभीर दीर्घकालीन आजार जसेकी बी पी, डायबेटीस, थायरॉईड, मायग्रेन, अर्थराइटिस, अल्झायमर, पार्किन्सन आदींवर आधुनिक मशीनच्या साह्याने मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत या सुविधेमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी 350 हून अधिक नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे मनपा चे डेप्युटी कमिशनर मा. श्री. डॉ. रमेशजी शेलार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खिल्लारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. शरदजी झिने, क्षत्रिय वैद्यकीय अधिकारी धनकवडी सहकार नगर सौ. डॉ. स्वाती पंकज बढिये, सीएसबी बँक मॅनेजर सौ. कीर्ती वडके, ऑरा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर श्री बालाजी कल्याणे, मा. श्री योगेश कल्याणे, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.श्री. विशाल अडागळे, महाराष्ट्र न्यूज मराठीचे/ कात्रज वार्ताचे संपादक मा. श्री. शहाजान शेख आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच या उपक्रमाचे नियोजक बॉडीफाय कंपनीचे डायरेक्टर डॉ. श्री अजय हेडगिरे, सौ. सीमा वालसा, सौ. कविता नायडू, अधि उपस्थित होते.
आरोग्य हीच खरी संपत्ती या ध्येयाने ऑरा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सतत समाजहितर्थ सामाजिक उपक्रम राबवत असून सर्वसामान्य नागरिकांना मोफत आधुनिक वैद्यकीय सेवा मिळवून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. प्रतिनिधीशी बोलताना हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी मा. श्री. अनिलजी रेलेकर त्यांनी सांगितले या फिजिओथेरपीच्या दहा दिवसांमध्ये लाभ घेण्यासाठी किमान पाच हजार रुपये इतका खर्च येत असून या ठिकाणी हीच सेवा निशुल्क उपलब्ध असून या उपक्रमाचा परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून या क्रमांकावर संपर्क साधून 7620445996 / 7620442624 लाभ घेण्यासाठी जाहीर आव्हान करण्यात आले आहे.

