A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

घरफोडी, वाहनचोरी, बळजबरी यासारखे सात गुन्हे केले उघड

चंद्रपूर शहर पोलिसांची कार्यवाही

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

 

चंद्रपूर :- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी चोरी गेलेल्या वाहनाच्या शोधात चंद्रपूर शहर पोलिसांना गुन्हेगारीची टोळीच गळाला लागली, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी करणारी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला, यात 4 आरोपींना अटक करीत 7 वेगवेगळ्या गुन्ह्यातील 5,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बाबूपेठ परिसरातील इसम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 14एप्रिल रोजी रॅली मध्ये गेले असता, परत आल्यानंतर त्यांचे घराचे कुलूप तोडून अलमारीतील सोने चांदीचे दागिने व नगदी रक्कम चोरी झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला, दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्ड वरील आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंकया कोपेलवार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपीने स्नेहा उर्फ भारती उर्फ मुस्कान व तनवीर बेग (रा. चंद्रपूर) सोबत मिळून दिनांक 14 एप्रिल ला बाबूपेठ तर 17 एप्रिल ला राजुरा येथे चोरी किल्ल्याची कबुली दिली तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या मोहम्मद फैजान मोहम्मद वकील अन्सारी याला नागपूर येथून अटक करण्यात आली.

आरोपी व्यंकटेश उर्फ व्यंक्या महेंद्र कोपेलवार (22 वर्षे) रा. महाकाली कॉलरी चंद्रपुर, स्नेहा उर्फ भारती उर्फ मुस्कान सुरेश खैरे (29 वर्ष) रा.नुराणी मस्जीद जवळ, भिावापुर वार्ड चंद्रपूर, तनविर कदीर बेग, (24 वर्षे) रा.भंगाराम चौक भिवापुर वार्ड चंद्रपुर व मोहम्मद फैजान मोहम्मद वकील अंसारी (40 वर्ष) रा. कब्रीस्तान रोड, कमाल अंसारी हाउस जवळ, महात्मा फूले बाझार, भारखेडा, नागपुर, जि. नागपुर अश्या एकूण 4 आरोपींना अटक करीत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, नगदी रक्कम व एक मोटरसायकल असा 3,96,000 रुपयांचा मुद्देमाल तर राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत 3 गुन्ह्यातील 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल तर नागपूर येथून चोरी केलेली मोटर सायकल असा एकूण 7 गुन्ह्यातील 5,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अप्पर पोलीस अधिक्षक, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे नेतृत्वात संदीप बच्छीरे पोउपनि, पोउपनी कोलटे पोहवा सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, राहुल चितोडे, ईर्शाद खान, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

गुन्ह्याचा पुढील तपास मपोहवा भावना रामटेके व पोहवा संतोषकुमार कनकम करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!