A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र
Trending

मनरेगाच्या कामकाजामध्ये फेस ऑथेंटिकेशनमुळे येणार अधिक पारदर्शकता..!

 

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव

अहिल्यानगर जिल्हा, दि. २२ ऑक्टोबर २०२५

 

मनरेगाच्या कामकाजामध्ये फेस ऑथेंटिकेशनमुळे येणार अधिक पारदर्शकता..!

मजुरांच्या उपस्थिती नोंदीसाठी ई-केवायसीसह डिजिटल प्रणालीचा वापर सुरू

 

महालता गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) आता कामावर उपस्थित राहणाऱ्या मजुरांची नोंद फेस ऑथेंटिकेशन प्रणालीद्वारे केली जाणार आहे. या उपक्रमामुळे मनरेगा कामकाजात अधिक पारदर्शकता, अचूक उपस्थिती नोंद व गैरव्यवहारांवर नियंत्रण येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहिल्यानगर यांनी दिली आहे.

 

राज्यभर ही प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथरी, जामखेड, कर्जत व राहुरी तालुक्यात या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. आता मजुरांना मास्टर रोलवर हाताने सही करण्याऐवजी ई-केवायसी व फेस ऑथेंटिकेशनद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

 

या उपक्रमामुळे मनरेगाच्या निधीचा अपव्यय रोखला जाऊन शासनाच्या निधीचा योग्य वापर सुनिश्चित होईल. तसेच प्रत्येक मजुराला आपली उपस्थिती व कामाची नोंद ऑनलाइन पाहता येणार आहे.

 

मुख्य वैशिष्ट्ये:

 

1. मजुरांची उपस्थिती मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन प्रणालीने घेतली जाईल.

 

 

2. इंटरनेट आणि स्मार्टफोन सुविधांअभावी काही अडचणी येऊ शकतात; त्यावर शासनाचे लक्ष आहे.

 

 

3. पारदर्शकतेकडे मोठे पाऊल – मनरेगा योजनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढणार.

 

 

स्थानिक प्रशासनाचे आवाहन:

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांनी आपले आधार कार्ड व ई-केवायसी तपशील अद्ययावत ठेवावेत, जेणेकरून फेस ऑथेंटिकेशन प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये.

 

Back to top button
error: Content is protected !!