
महिला पोलीस शिपाई श्रुती कढणे 9396 कोथरूड पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी कार्यरत असून त्या पुणे पोलीस दलामध्ये महिला बॉक्सिंग कोच असून त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. तसेच त्यांनी या खेळामध्ये एन आय एस प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा फायदा इतर महिलांना होण्यासाठी आतापर्यंत 40 शाळा, 1 वस्तीग्रह, 12 महाविद्यालय, अंध मुलीची शाळा तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सोसायटी मध्ये महिला संरक्षणासाठी महिलांना माहिती व प्रोत्साहन दिले आहे. सन 2024 मध्ये बंडगार्डन पोलीस स्टेशन गु. र. क्र 18/2024 भादवि कलम 363 मधील मोहम्मद सलीम शेख याने वय 7 महिन्याच्या मुलाचे अपहरन करून कोथरूड पोलीस ठाणे येथील डेपो चौकीजवळ नाल्यात टाकलेल्या मुलाचे आई बनून दुध पाजुन दिवसभर सांभाळ करून आपल्या मुलाप्रमाणे लहान बाळाला जपले व सि. डब्ल्यू.सीच्या आदेशान्वये अरुणाश्रेय चॅरिटेबल ट्रस्ट येथे स्वाधीन करण्यात आले.
अशा या उत्कृष्ट कामगिरीने महिला पोलीस शिपाई श्रुती कढणे यांना द पुणे मिरर टाइम्स बिग सॅल्युट अवॉर्ड 2025 ने पुणे पोलीस अधीक्षक श्री अमितेश कुमार सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.




