A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्रसंगमनेर

रामनवमी साई भक्त पालखी आयोजन

संगमनेर शेहरात,
आयोजित रामनवमी पालखी कार्यक्रम

🙏ओम साई राम🙏

साई दर्शन वारकरी परिवार आयोजित रामनवमी निमित्त मंगळापूर -संगमनेर -शिर्डी ते शिर्डी- संगमनेर- मंगळापूर पायीवारी व पालखी सोहळा शनिवार दिनांक ०५/०४/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या दिंडी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त साईभक्तांनी सहभागी व्हावे. सकाळी ७.०० वा. साई वारकरी श्री.वसंत विठ्ठल पवार यांचे निवासस्थानी आरती होईल व तेथून ७ वाजून 30 मिनिटांनी शिर्डी येथे दिंडीचे प्रस्थान होईल. व शिर्डी मध्ये दिंडी संध्याकाळी नऊ वाजता पोहोचेल व साई पालखीसह रात्री दहा वाजता परतीचा प्रवास शिर्डी ते संगमनेर असा होईल व सकाळी ११.०० पर्यंत साई पालखी साई मंदिर संगमनेर येथे पोहोचेल याची सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी. ज्या साई भक्तांना दिंडीमध्ये सहभाग घ्यायचा आहे अशा सर्व साई भक्तांनी सकाळी ७.००वा.श्री वसंत विठ्ठल पवार यांची घरी जमावे. 🙏ओम साई राम🙏

       रिपोर्टर, रविलाल गंगादास पटेल 
                संगमनेर 
Back to top button
error: Content is protected !!