A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

चार टोळीप्रमुखांसह ४२ गुंड तडीपार,पुणे पोलिसांची कारवाई…

चार टोळीप्रमुखांसह ४२ गुंड तडीपार,पुणे पोलिसांची कारवाई...

पुणे : लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार पुण्यामध्ये होऊ नये, यासाठी कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पुणे पोलिसांनी ४२ गुंडाना तडीपार केले आहे. तडीपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे. कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर भागांत गुन्हेगारांची दहशत वाढली आहे.

शहरातील पोलिस ठाण्याची पाच परिमंडळांमध्ये विभागणी केली आहे.यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र परिमंडळ पाचचे आहे. या भागांत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अन्य परिमंडळांच्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे परिमंडळ पाचमध्ये कारवाई करण्यात आली.

शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगने दहशत माजवली होती. सुरुवातीला हडपसर भागात कोयत्याने वार केल्याचे अनेक प्रकार घडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्‍विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना ( पुणे ) तडीपार केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!