A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्रमुंबई

बदलापूरमध्ये पूर जनक स्थिती

मांजर्ली,हेंद्रेपाडा,मोहनानंदनगर,शनीनगर,परिसरात साचले पाणी

ठाणे प्रतिनिधी {प्रसाद दिनकरराव} – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरांमध्ये पूर जनक स्थिती झाली आहे बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोरदार बॅटिंग सुरू असून गुरुवारी पहाटेपासूनच बदलापुरात पावसाने अधिक जोर धरला आहे बदलापूर मध्ये तुफान पाऊस झाल्याने शहरातील अनेक रस्ते,सोसायटी शाळा,दुकान,पाण्याखाली गेले आहेत

बदलापूर मध्ये नेहमीच पुराचा जास्त फटका हा बदलापूर मधील पश्चिम भागाला बसतो यामुळे बदलापूर पश्चिम भागातील जनजीवन नेहमीच विस्कळीत होत असते गुरुवारी हीच परिस्थिती बदलापूरकरांच्या नशिबी आली बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा,मोहनानंदनगर,मांजर्ली,शनीनगर,परिसरात पाणी साचले या पाण्यामुळे अनेक रहिवाशांचे नुकसान ही झाले व रहिवाशांच्या मोटरसायकल ह्या पाण्याखाली गेल्या आहेत

बदलापूर गाव व बदलापूर शहर यांना जोडणारा रस्ता उल्हास नदीच्या पुलावरून पाणी जात असलेल्या कारणाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून बदलापूरच्या आस-पासमधील असलेल्या गावाशीही संपर्कही तुटला व बदलापुरकराच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच नियंत्रण कक्ष मंत्रालयाकडून मुंबई, मुंबई उपनगरमध्ये व ठाणे जिल्ह्यात पुढील २४तासा करता अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे या मुले नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे

Back to top button
error: Content is protected !!