A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

अग्निशस्त्राच्या गुन्हयांतील आरोपी यांस अटक करुन त्याचेकडुन चोरीची बुलेट व ऍक्टिवा अशा मोटार सायकली जप्त

अग्निशस्त्राच्या गुन्हयांतील आरोपी यांस अटक करुन त्याचेकडुन चोरीची बुलेट व ऍक्टिवा अशा मोटार सायकली जप्त

सिहंगड रोड (पुणे) वंदे भारत लाईव्ह न्यूज गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ असे सिंहगड रोड पोलीस ठाणे हददीत पाहिजे फरारी व तडीपार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गणेश सुतार व ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की, धायरी पुणे येथील श्री कंट्रोल चौक ते अभिनव कॉलेज रोडवर एक इसम बुलेट गाडी घेवुन थांबलेला असुन त्याचेकडे असलेली बुलेट चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली
मिळालेले बातमीच्या ठिकाणी युनिट ३ कडील सहा.पो.निरी. ढवळे व अंमलदारासह जावुन इसन नामे अदित्य अतुल माने वय.२२ वर्षे. रा. माने निवास, प्रभात प्रेस जवळ अभिनव कॉलेज पाठीमागे धायरी पुणे यास बुलेट गाडी सह ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याचा मामेभाऊ याने सात ते आठ महिन्यापुर्वी नसरापुर येथुन गाडी चोरलेली असल्याचे सांगितले. त्याबाबत राजगड पोलीस ठाणे येथे खात्री करता राजगड पोलीस ठाणे गु.र.नं ९२/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद असल्याचे आढळुन आलेले असुन सदर आरोपीस पुढील तपासकामी राजगड पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिलेले आहे.
तसेच सिहंगड रोड पोलीस ठाणे गु.र.नं ७२३/२०२४ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५). महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ मधील पाहिजे आरोपी नामे साहिल सागर शेलार वय. १९वर्षे रा. पानशेत रोड गो-हे खुर्द पुणे यांस अटक करुन त्याचेकडुन सुमारे १५ दिवसापुर्वी राजगड पोलीस ठाणे गु.र.नं ५५९/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेली २५,०००/-रु. कि.ची एक काळे ग्रे रंगाची ऍक्टिवा मोपेड जप्त करुन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तसेच आरोपीवर यापूर्वी सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.२४१/२०२४ भा.दं.वि.क. ३७९ अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे श्री शैलेश बलकवडे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री निखिल पिंगळे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे श्री. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनखाली युनिट ३ गुन्हे चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. रंगराव पवार सहा. पो. निरी. ज्ञानेश्वर
ढवळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, गणेश सुतार, सुजित पवार, संजीव कळंबे, महिला पोलीस अंमलदार सोनम नेवसे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, हरिश गायकवाड, इसाक पठाण व यांनी कामगिरी केलेली आहे.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!