
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चंद्रपूर :- बाबूपेठ परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल खाली असलेल्या भंगार दुकानाला आज सकाळी आगीने अचानक पेट घेतला, भंगार साहित्यामुळे आगीने भीषण स्वरूप प्राप्त केले, बाजूलाच चांदाफोर्ट रेल्वेचा रूळ आहे सुदैवाने याकाळात कोणतीही रेल्वे आली नाही अन्यथा मोठी घटना घडली असती.
चंद्रपूर शहरातील नव्याने सुरू झालेल्या उडानपुला ला दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी पहाटे उडानपुला खाली असलेल्या भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागली या आगीचे स्वरूप एवढे भीषण होते की त्याचा धूर उडान पूलावर पसरला होता बाजूला लोकवस्ती असल्याने आगीचा लोंढा घरापर्यंत पसरत होता,
स्थानिकांनी अग्निशामक पथकाला पाचारण केल्याने अग्निशमन काही वेळातच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही, सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही आणि वेळेतच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.